सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. गाडी चालवताना नेहमी नियमांचं पालन करावं, अशा प्रकारच्या अनेकविध सूचना अनेकदा देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. एक अपघात आपलं किंवा दुसऱ्याचं आयुष्य संपवू शकतो हेदेखील आजकाल कोणाला कळत नाही.

रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं. तर अनेकदा घाईघाईत माणसं ओव्हरटेक करायला जातात आणि स्वत:चं नुकसान करून घोतात. सध्या असाच काहीासा प्रकार एका माणसाबरोबर घडलाय, ज्यात घाईघाईत जाण्याच्या नादात दुचाकीस्वार दोन बसच्या मध्येच अडकला. नेमकं झालं काय, जाणून घेऊ या…

horn
हे फक्त पुणेकरच करू शकतो! दुचाकी चालवताना चालकाने तर कहर केला, हॉर्न ऐवजी….,Viral Video बघाच
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Shocking video of a Man peed in pants in running train video viral on social media
सीटवर झोपला अन् चालत्या ट्रेनमध्येच केली लघवी, ‘त्या’ माणसाबरोबर नेमकं घडलं तरी काय? पाहा धक्कादायक VIDEO
Sharad Pawar on Uday Samant
Sharad Pawar: पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, “मी वाट बघतोय…”
Blast in Maharashtra’s Bhandara Ordnance Factory| Explosion at Bhandara Ordnance Factory
Bhandara Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे
Virender Sehwag and wife Aarti unfollow each other on Instagram amid divorce rumours
Virender Sehwag Divorce : वीरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाची का होतेय चर्चा? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”

दोन बसच्या मध्ये अडकला दुचाकीस्वार

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सगळ्याच दुचाकीचालकांनी बघितला पाहिजे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक दुचाकीस्वार घाईघाईत बसला ओव्हरटेक करायला जातो आणि दोन बसेसच्या मध्येच फसतो. घाईत जाण्यासाठी तो दोन बसच्या मधून आपला आपली गाडी टाकतो. पण त्याचा हा प्रताप तिथेच अयशस्वी होतो कारण त्याची गाडी मधल्यामध्ये अडकते. मध्ये अडकल्यावर त्याला काय कराव हे सुचत नाही तेव्हाच बस कंडक्टर त्याची मदत करून हळूहळू पुढे गाडी नेण्यास त्याला सांगतो आणि तो मोठ्या होणाऱ्या दुर्घटनेपासून बचावतो.

दुचाकीस्वाराचा हा व्हिडीओ @ratnmala.shejul.3 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ट्रॅफिकमधून वाट काढताना “बाईकचालक दोन बसच्या मधोमध अडकला” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच, या व्हिडीओला तब्बल ५ लाखांपेक्षा जास्त व्हयुज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अति घाई संकटात नेई” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “म्हणून बाइक चालवताना उगाच घाई करू नये”

Story img Loader