Viral video: कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढवण्याचे हे प्रमाण जास्त वाढत आहे.

याच भटक्या कुत्र्यांसाठी पालिका उपाययोजना करत असते. त्यांना वेळच्या वेळी इंजेक्शन देणे यांसारखी काळजी घेतली जाते. प्रशासनाची गाडी येते आणि कुत्र्यांना घेऊन जाते. अशाच काही भटक्या कुत्र्यांना गाडीतून घेऊन जाताना काही तरुणांनी असं काही केलं की हे पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित राहत असून हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तुम्हीही हा व्हायरल व्हिडीओ पाहा आमि सांगा या तरुणांनी बरोबर केलं की चुकीचं…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावरुन एका गाडीमध्ये बंद करुन १० ते १५ भटक्या कुत्र्यांना घेऊन जात आहे. यावेळी सगळे कुत्रे गाडीमध्ये बंद केले आहेत. या दरम्यान दोन तरुण बाईकवरुन येतात आणि चक्क भटक्या कुत्र्यांना बंद केलेल्या गाडीचं कुलूप मागच्या मागे उघडतात. एक दुचाकीस्वार महानगरपालिकेच्या वाहनातील पिंजऱ्यातून काही कुत्र्यांना सोडवत आहे. जसं कुलुप उघडतात तसे सगळे कुत्रे गाडीतून थेट रस्त्यावर उड्या मारतात आणि पळून जातात. या सगळ्यात गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला मागे काय चाललंय याची काहीही कल्पना नसते. त्यामुळेच त्या व्यक्तीने कुत्र्यांना महानगरपालिकेच्या वाहनातून मुक्तता केली ते चुकिचे केले का बरोबर हा प्रश्न उपस्थित राहत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आई ती आईच..! माकडानं स्वत:च्याच खोडकर पिल्लाच्या मारली कानशिलात; VIDEO झाला व्हायरल

संपुर्ण देशात भटक्या कुत्र्यांची दहशत

बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. नुकतेच गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तीन वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पायी चालत जाणे किंवा सायकल चालविणाऱ्यांना हे कुत्रे आपले लक्ष्य बनवितात.