Viral video: सध्या सगळीकडे लग्नाचा माहोल सुरु आहे. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. यातच सर्वात भावनिक क्षण असतो ते म्हणजे नवरीची पाठवणी. नवरी माहेर सोडून सासरी जात असते. आपल्या मायेच्या माणसांना मिठी मारुन ढसाढसा रडते. मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओतील नवरीला पाहून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल.

निरोपाच्या वेळी नवविवाहित वधूचे रडणे स्वाभाविक आहे. या दिवशी ती आपले कुटुंब सोडून नवीन कुटुंबात जाते. हा क्षण प्रत्येक कुटुंबासाठी भावनिक असतो. या व्हिडीओमध्ये नवरीची पाठवणी पाहून तुम्हाला सुरुवातीला धक्काच बसेल. मात्र नंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही. नवरीची पाठवणी हा खूप भावनिक क्षण असला तरी या नवरीच्या हाय व्होलटेज ड्रामामुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अरेंज मॅरेज असल्यामुळे परक्या कुटुंबात जाताना नवरी घाबरल्याचं दिसत आहे. सर्वच मुली सासरी जाताना रडतात मात्र या नवरीची अवस्था पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
a child girl amazing lavani dance
Video : चिमुकलीने सादर केली अप्रतिम लावणी, चेहऱ्यावरील हावभाव पाहून क्षणभरासाठीही नजर हटणार नाही; व्हिडीओ होतोय व्हायरल
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती एका नवरीला खांद्यावर उचलून आणताना दिसत आहे. मात्र ही नवरी जोरजोरात”पापा पापा” म्हणत रडत आहे. ज्या वेळेस तरुण नवरीला उचलून आणत असतो. त्यांच्या समोर असलेला कॅमेरा मॅन सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद करत आहे. व्हिडिओ पाहून समजेल की,जी तरुणी रडत आहे तीची पाठवणी सुरु आहे. . कुटुंबाला सोडताना रडत असताना मुलीची अवस्था वाईट झाली होती.  सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते” भर रस्त्यात तरुणांबरोबर काय घडलं पाहा; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ @memechatapp या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत,”अरेंज मॅरेज भीतीदायक आहे” असे कॅप्शन लिहिण्यात आलेले आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत. नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, “पहिली गोष्ट म्हणजे ही मजेदार गोष्ट नाही ..विदाई काय आहे, त्याची चेष्टा करत आहेस.” तर आणखी एकानं “वडिलांवर खूप प्रेम करणाऱ्या गरीब साध्या खेडेगावातील मुलीची काही लोक खिल्ली उडवत आहेत., हे एक मुलगीच समजू शकते की त्या मुलीला काय वाटत असेल.” अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader