Wedding Viral Video: लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लग्न प्रत्येकासाठीच खूप खास असतं. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही औरच असते. लग्नसोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या कायम लक्षात राहतात.
लग्नसोहळ्यात अनेक प्रथा पाळल्या जातात. त्यात नव्या नवरीने उखाणा घेणं हे आलच. पण याचबरोबर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात ज्या सगळेच अगदी हौशीने पूर्ण करतात. पण या प्रथेदरम्यान, आपण कसल्याही मर्यादा तर ओलांडत नाही ना याची काळजी नव्या नवरीला आणि नवऱ्याला घ्यायची असते.
सोशल मीडियावर लग्न झालेल्या जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यात नवरीने प्रथा पार पाडत असताना हद्दच पार केली. नेमकं असं घडलं तरी काय, जाणून घेऊ या…
नववधूचा व्हिडीओ व्हायरल (Bride Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नुकतंच लग्न झालेलं जोडपं सगळ्या नातेवाईकांसमोर बसून काही प्रथा पार पाडताना दिसतायत. सगळ्या प्रथा सुरू असताना नववधू नवऱ्याच्या जवळ जाते आणि त्याच्या तोंडात असणारी एक वस्तू काढते. नवरीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना असंही वाटतंय की ती नव्या नवऱ्याला सगळ्यांसमोर किस करतेय. पण व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे काही नेटकरी असं म्हणाले आहेत की, ती प्रथा आहे.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला व्हिडीओ @marathiveda या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “भावानं आयुष्यात लय पुण्य केलं असेल म्हणून अशी बिनधास्त बायको भेटली” अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओला तब्बल १.२ मिलियन व्ह्यूज आले आहेत. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकलं नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
नववधूचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “लाजा वाटायला पाहिजे” तर दुसऱ्याने “ही कदाचित त्यांच्याइथली प्रथा असणार” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला “मनाची नाही, जनाची तरी बाळगा”. तर एकाने “पुण्य करून अशी बायको मिळत असेल, तर पाप केलेलं बर” अशी कमेंट केली.