सध्या सगळीकडे लग्नाचा माहौल सुरूये. सोशल मीडियावर दररोज नव नवे लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येत आहेत. यातल्या काही व्हिडीओंमध्ये तुम्हाला ब्राइड स्पेशल एन्ट्री पहायला मिळते, तर काहींमध्ये नवरदेवाचा अनोखा स्वॅग पहायला मिळतोय. लग्नातील सर्वात भावनिक क्षण असतो तो म्हणजे नवरीची पाठवणी. नवरी माहेर सोडून सासरी जात असते. आपल्या माहेरच्या मंडळींचा निरोप घेत असते. त्यावेळी सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटतो. नवरी आपल्या मायेच्या माणसांना मिठी मारून ढसाढसा रडते. आतापर्यंत नवरीच्या पाठवणीचे असेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात नवरीची पाठवणी पाहून तुम्हाला सुरूवातीला धक्काच बसेल. पण नंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरीची पाठवणी हा खूप भावनिक क्षण असला तरी या नवरीच्या हाय व्होलटेज ड्रामामुळे हा व्हिडीओ बराच चर्चेत आलाय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर नवरीने आपला वेगळाच अवतार दाखवला. सासरी जाता जाता तिने सासरच्यांसह माहेरच्यांनाही मोठा धक्का दिला आहे. असं नेमकं या नवरीने काय केलं असा प्रश्न तुमच्या मनात आला असेलच. लग्नाच्या सर्व विधी संपल्यानंतर जेव्हा पाठवणीची वेळ येते तेव्हा ही सासरी जाण्यासाठी नकार देते. इतकंच काय तर ती ओक्‍साबोक्‍शी रडू लागते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : इवल्याश्या बदकानं शिकारीसाठी पाण्यात उतरलेल्या वाघाला चक्रावून सोडलं! पहा कसं ते…

या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, नवरी कपडे आणि मेक-अप सारं अस्ताव्यस्त आहे. इतकं रडूनही नवरी सासरी जायला तयार होत नाही. यानंतर, अक्षरशः नवरीचे घरचे तिचे हातपाय पकडून तिला बाहेर आणतात आणि जबरदस्ती कारमध्ये बसवून तिची पाठवणी करतात. त्यानंतरही नवरीचा हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच असतो. पण, तिचे घरचे मागे हटत नाहीत आणि नवरीची पाठवणी करूनच मोकळे होतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : धावती ट्रेन पकडत असताना तोल गेला, मग झालं असं काही की तुम्हीही म्हणाल चमत्कार!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : टांझानियाच्या ‘त्या’ तरूणाने Nora Fatehi ला दिली तगडी टक्कर! ‘Dance Meri Rani’ गाण्यावरचे डान्स मूव्ह्स पाहून तुम्ही व्हाल थक्क!

नवरीच्या या अनोख्या पाठवणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 69.flix नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी व्हिडीओमध्ये त्यांच्या काही ओळखीच्या लोकांना टॅग केलं आहे. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख २४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

लोक या व्हिडीओचा पुरेपर आनंद घेताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरणं कठीण होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना वेगवेगळे विनोद शेअर करण्यास सुरूवात केली आहे. हे कमेंट्स सुद्धा वाचण्यासारख्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of bride viral video high voltage drama of bride netizens react in this way prp