सोशल मीडियावर दररोज वेगवगेळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ फारच धक्कादायक असतात. असे व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसतो. कधी कधी तर असे व्हिडीओ पाहून स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक पूल अगदी वाहत्या पाण्यात कागद वाहून जातो त्याप्रमाणे वाहून गेला आहे. एवढंच नव्हे तर या पूलावरून जाणारे अनेक लोक त्यांच्या वाहनांसह होड्यांप्रमाणे वाहून गेले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मनात धडकी भरू लागते.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हवामान खूपच खराब झालेलं दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून एक माणूस कोणाची तरी वाट पाहत आहे. तर दुसरीकडे नदीवर बांधलेल्या पुलावरून लोकांची सतत ये-जा सुरू आहे. पुलावर फारशी गर्दी नसली तरी पाण्याचा जोरदार प्रवाह नक्कीच वाहताना दिसतो. काही वेळाने तो पूल भरल्यानंतर तो कोसळतो आणि ते भयानक दृश्य पाहून आजूबाजूचे लोक पळून जातात. पूल कोसळल्यानंतर अनेक लोक पाण्यात तरंगताना दिसत आहेत.
आणखी वाचा : अतिशय दुर्मिळ ‘ब्लॅंकेट ऑक्टोपस’ला कधी डान्स करताना पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : बादशाहच्या ‘सजना’ गाण्यावर विदेशी ‘डान्सिंग डॅड’नी केला जबरदस्त डान्स
memewalanews नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हा व्हिडीओ ब्राझीलमधील कुठल्यातरी ठिकाणचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र हा व्हिडीओ केव्हाचा आणि कुठला आहे, याची पुष्टी करू शकत नाही. हा व्हिडीओ पोस्ट झाल्यापासून व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे हे भितीदायक दृश्य पाहून कोणीही थक्क होऊ शकतो.