नुकताच देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा बहिण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण असतो. या दिवशी बहिण प्रेमाने भावाच्या हाताला राखी बांधते. हाताला राखी बांधल्यानंतर भाऊ ही राखी जमेल तितक्या दिवस जपायचा प्रयत्न करतो. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बहिणीने बांधलेल्या राखीला जपण्याचा हा तरुण प्रयत्न करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुण मुलगा घरी जेवण करत आहे आणि जेवताना हाताला बांधलेला राखीचा धागा मधे मधे येतोय, कधी भाजीमध्येही हा धागा जातोय. मात्र तरीही हा तरुण राखी काढत नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण हा व्हिडीओ आवडीने शेअर करत आहे. बहिणीने बांधलेली राखी जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

हेही वाचा : “जेव्हा शेतकऱ्याच्या घरी लॅपटॉप येतो …” पूजा केली, पाया पडला …; भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा VIDEO एकदा पाहाच

sidbobadi21 या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “बहिणीकडून रक्षाबंधन गिफ्ट” या मजेशीर व्हिडीओवर अनेक युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिले, “डाळ भातमध्ये नुडल्सची मजा” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, “सर्व भावांची ही एकच समस्या आहे” आणखी एका युजरने लिहिले, “माझ्याबरोबरही असच होतं”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of brother try to keep rakhi on hand at any cost brother sister love do you have same problem funny video goes viral ndj