तुम्ही प्राण्यांना आपापसात भिडलेले पाहिले किंवा ऐकले असेल. काही मारामाऱ्या इतकी गोंडस असतात की त्यांना पुन्हा पुन्हा पाहायची इच्छा असते. तर, लोक काही लढाया बघून स्तब्ध होतात. विशेषतः, जेव्हा शांत असलेले प्राणी एकमेकांशी भिडतात, तेव्हाचे दृश्य फार भयावह असतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. तुम्ही आतापर्यंत बड्या बड्या प्राण्यांनी हल्ला केलेला पाहिला असेल, पण कायम आपल्याच धुंदीत असलेल्या आणि शांतपणे चारा चरत असलेल्या म्हशीला कधी हल्ला करताना पाहिलंय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
प्राण्यांच्या मनात कधी काय चाललेलं असतं याबाबत कुणीच काही सांगू शकणार नाही. ते कोणावर कधी प्रेमाचा वर्षाव करतील आणि कधी हल्ला करतील याचा अंदाज बांधणं फार कठीण असतं. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ तुमच्या पाहण्यात आले असतील. प्राणी अचानक भडकतात आणि इतर प्राण्यांवर किंवा माणसांवर हल्ला करतात. असाच हा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये म्हशीने ज्या स्टाईलने तबेल्यात आलेल्या लोकांवर हल्ला केल्याचं पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. हा हल्ला इतका जोरदार होता की अनेक लोक तबेल्या गेटच्या बाहेर जाऊन पडले.
आणखी वाचा : क्रेनसमोर अचानक एक महाकाय हत्ती आला, मग गजराजाने पुढे काय केलं, पाहा VIRAL VIDEO
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तबेल्यात बऱ्याच म्हशी उभ्या असलेल्या दिसून येत आहेत. सगळ्या म्हशी शांत उभा राहत आपल्याच धुंदीत असताना अचानक त्यांच्यातली एक म्हैस तबेल्याच्या गेटच्या दिशेने धावत येताना दिसून येत आहे. ही म्हैस नक्की धावत येतेय हे दाखवण्यासाठी कॅमेरा जस जसं तबेल्याच्या गेटच्या दिशेने फिरतो, तेव्हा तबेल्याच्या गेटमधून काही माणसं घोळक्याने आत शिरताना दिसून येत आहेत.
आणखी वाचा : प्रेमासाठी काय पण! सुटकेसमध्ये गर्लफ्रेंडला टाकून होस्टेलबाहेर घेऊन जात होता, पाहा हा VIRAL VIDEO
ही सर्व मंडळी तबेल्याच्या गेटमधून आत येण्याचा प्रयत्न करत होते. हे जणू त्या म्हशीला फारस आवडलेलं दिसत नाहीय. हे सर्व माणसं गेटमधून तबेल्यात येत असताना ही म्हशीने पाहिलं होतं. त्यानंतर ही म्हैस माणसांच्या दिशेने धावत पुढे येत त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. म्हैस आपल्या दिशेने धावत येताना पाहून ही माणसं देखील गेटबाहेर पडण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पण या म्हशीने या माणसांना बरोबर गाठलं आणि आपल्या शिंगानी शेवटच्या काही माणसांवर हल्ला केला. म्हशीने केलेला हा हल्ला इतका भयंकर होता की, ही माणसं एका हल्ल्यात गेटबाहेर पडली. या घोळक्यात कितीतरी जण हे वयोवृद्ध देखील होते.
आणखी वाचा : बकरी आणि गाढवाच्या मैत्रीचा VIDEO VIRAL, झाडाची पानं खाण्यासाठी केला असा जुगाड…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : “पप्पा आमच्यासाठी काम करतात, ते जेवणही करत नाहीत,” या चिमुकलीचा भावूक VIDEO VIRAL
हा व्हिडीओ nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा मजेदार व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. लोक या व्हिडीओला भरपूर आनंद घेत आहेत. हा व्हिडीओ शेअर करून अवघे २४ तास देखील उलटले नाहीत तर आतापर्यंत या व्हिडीओला २६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ जितका मजेदार आहे, त्याहूनही जास्त मजेदार या व्हिडीओखालील कमेंट्स आहेत.