Viral Video : सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडीओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यात अनेक व्हिडीओ मजेशीर असतात. मात्र, काही व्हिडीओ असे असतात की; जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडीओ अनेकदा धडकी भरविणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळाल्यानंतर आता गावोगावी यात्रांमध्ये बैलगाडा शर्यत हे मुख्य आकर्षण ठरत आहे. दरम्यान, अशाच एका बैलागाडा शर्यतीचा थरारक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. बैलगाडा शर्यतीचा नाद काय असतो हे या व्हिडीओमध्य बघायला मिळालं आहे कारण ही बैलगाडा शर्यत बघण्यासाठी रस्त्यावर चक्क एसटी थांबवली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सध्या ग्रामीण भागात यात्रोत्सवात अनेकांना बैलगाड्यांच्या शर्यतींची क्रेझ असते. या शर्यती भलत्याच रंगात येताना पाहायला मिळतात. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी अगदी नीट बोलायला न येणारे बाळ ते वयोवृद्धही येत असतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मोठं मैदान दिसत आहे आणि मैदानाच्या भोवती गोल सर्व प्रेक्षक जमले आहेत. अशातच मैदानाच्या बाहेर रस्त्यावर एक एसटी थांबलेली आहे. मात्र व्हिडिओत तुम्ही नीट ऐकले तर समजेल की, बैलगाडा शर्यतीचा शेवटचा दिवस होता आणि त्यातल्या त्यात अंतिम शर्यत पार पडणार होती. जी पाहण्यासाठी अनेक नागरिकांसह ती ए.स.टी. महामंडळाची बसही थांबलेली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल नाद पाहिजे फक्त…शेवटी शर्यतीच्या आयोजकांनीही याची नोंद घेतली आणि शर्य पाहण्यासाठी एसटी महामंडळही थांबलंय अशी घोषणा केली.

ही बैलगाडा शर्यत पूर्वीपासून भरवली जाते. शेतातील हंगाम संपल्यानंतर ग्रामदैवताच्या ठिकाणी जत्रा, उरूस भरवून या शर्यतीचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्रात काही ठिकाणी बैलगाडा शर्यतीला छकडा किंवा शंकरपट, असं सुद्धा म्हणतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> क्रिकेटचा सामना सुरु असताना आयुष्याची मॅच हरता हरता राहिला; तरुणाबरोबर काय घडलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल

खिल्लार जातीच्या बैलांना प्राधान्य

खिल्लार जातीच्या बैलांना या शर्यतीसाठी विशेष मान असतो. या बैलांचे गुणधर्म म्हणा किंवा शारीरिक वैशिष्ट्य असं की, ज्याप्रमाणे घोडा धावतो, त्याप्रमाणे खिलार जातीच्या बैलांची धावण्याची क्षमता असते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @TanviPol116027 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.