सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. अनेकदा काही भन्नाट व्हिडीओ नेटकऱ्यांचं खास लक्ष वेधून घेताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. त्याच कारण एक केक आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असलेला केक पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. नेटकऱ्यांनीही या व्हिडीओला चांगली पसंती दिली आहे.

तुम्ही केक ऑर्डर केला आणि तुमच्यासमोर भांडी घासण्यासाठी वापरला जाणारा स्कॉच ब्राइट आला तर? नक्कीच थोडंसं किसळवाणं वाटणं सहाजिकच आहे. स्कॉच ब्राइट हा भांडी घासण्यासाठी वापरला जाणारा काथ्या आहे. हुबेहूब स्कॉच ब्राइटसारखा दिसणाऱ्या एका केकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला पाहिलं की काही वेळासाठी आपल्याला प्लेटमध्ये स्कॉच ब्राइटचं मांडून ठेवलेत की काय असा भास होऊ लागतो. पण हा व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतर लक्षात येतं की तो स्कॉच ब्राइट काथ्या नसून त्याच्यासारखा दिसणारा केक आहे. स्कॉच ब्राइट प्रमाणेच त्याचा पिवळ्या रंगाचा बेस आणि हिरवा रंगाचा टॉप आहे. एक व्यक्ती काट्याने ते कापताना दिसते आणि नंतर ब्रेडचा पोत थोडासा दिसून येतो.

केक आणि क्रिमचा वापर करून हुबेहुब स्कॉच ब्राइटची प्रतिकृती साकारली आहे. हा केक पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी किळसवाणा प्रकार असल्याचं सांगितलं. तर काही यूजर्सनी केक बनविणाऱ्याच्या कौशल्याचं कौतूक केलंय.

आणखी वाचा : उकडलेले अंडे सोलण्याची ही अनोखी आयडिया पाहून हैराण व्हाल! पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘व्हेन पॉप्स इज द बॉस’! पायलट बाप-लेकाची जोडी एकत्र उड्डाण करतानाचा VIDEO VIRAL

लोकप्रिय स्विस-फ्रेंच पेस्ट्री शेफ अमौरी गुइचॉनने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्याच्या नवीन चॉकलेट वंडरचा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर तो बघता बघता व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला २.४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलंय. लोक या व्हिडीओर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Story img Loader