ऑफिसमधून घरी जाताना, खूप दिवसांनी एखादा खास मैत्रीण-मित्र भेटल्यावर किंवा काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाल्यावर आपण सगळेच चाट विक्रेत्याकडे जातो आणि पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, दहीवडे, दहीपुरी खाण्याचा आनंद घेतो. पण, कधी कधी या विक्रेत्यांचा स्टॉल पाहून किंवा त्यांची बनवण्याची पद्धत पाहून आपण तेथील पदार्थ खाण्यास टाळतो. पण, आज सोशल मीडियावर एका अनोख्या चाट विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे हे पाहून तुम्ही त्याचे कौतुक कराल एवढं नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरवातीला चाट विक्रेता त्याच्या कारमधून एंट्री घेतो. एका व्यक्तीच्या मदतीने गाडीच्या डिक्कीतून दह्याने भरलेले डब्बे एक एक करून बाहेर काढतो. त्यानंतर एका मोठ्या टोपात वर्तुळाकार वड्यांची रचना करून मध्ये जागा रिकामी ठेवलेली असते. त्यानंतर त्या रिकामी जागेत विक्रेता बर्फाचा तुकडा ठेवतो आणि त्याला सुरीने फोडतो. नंतर टोपावर झाकण ठेवून देतो. एकदा तुम्ही सुद्धा पाहा हा या विक्रेत्याचा व्हिडीओ.

हेही वाचा…श्वानाला अमानुष मारहाण करणाऱ्या ‘त्या’ दोन तरुणांना अखेर अटक; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

चाट विक्रेता एक टेबल घेतो आणि त्यावर बर्फ आणि वड्यांची रचना करून घेतलेला मोठा टोप ठेवतो. टोपाच्यामध्ये जिथे बर्फ फोडून टाकलेला असतो. तिथे विक्रेता दोन डब्बे दही ओतताना दिसतो आहे. त्यानंतर दहीमध्ये वडे बुडवून त्यावर झाकण ठेवून देतो. चाटमध्ये ज्या ज्या चटण्या ग्राहकांना खायला आवडतात त्या प्रत्येक चटणीसाठी त्याने एक एक स्टीलचे डब्बा तयार केलेले असतात.

सगळ्यात शेवटी विक्रेता प्लेटमध्ये त्याच्या अनोख्या स्टाईलमध्ये दही वडे बनवून ग्राहकांना द्यायला सुरुवात करतो. चाट विक्रेत्याचा वेग आणि त्याचा नीटनेटकेपणाच नेटकरी कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @bhookasher1 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.