Chimpanzees Jumping in Fear of Snake : माणूस असो वा प्राणी, त्यांच्यातील भीती आणि निरागसता सारखीच असते. ज्या गोष्टींना माणसं घाबरतात त्यांना पाहून प्राणी सुद्धा घाबरू लागतात. लहान मुलं-मुली ज्या प्रकारचा खोडसाळपणा आणि मस्ती करतात अगदी तशाच पद्धतीन प्राण्यांची पिल्लेही मस्ती करताना दिसून येतात. एक लहान चिंपांझीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये माणसांप्रमाणेच चिंपांझी सुद्धा सापाला घाबरून उड्या मारताना दिसतोय. यात चिंपांझीची जी अवस्था झाली ते पाहून सर्वांना आपलं हसू आवरता येत नाहीय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये उडी मारणाऱ्या चिंपांझींना पाहून तुम्ही सुद्धा खळखळून हसाल. हा चिंपाझी मजा-मस्ती करत उड्या मारत नाहीय. तर चक्क एका सापाला पाहून घाबरून तो भीतीने उड्या मारू लागतो. सापाला पाहून त्याची अवस्था पाहण्यासारखी झाली आहे. हा साप आपल्याला चावेल या भीतीने हुबेहूब माणसासारखाच हा चिंपांझी सुद्धा पळू लागतो. लहान चिंपांझी त्याच्या आई-वडिलांच्या किंवा कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोर खेळत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मुलं खोडकर असतात. छोटा चिंपांझीही खोडकरपणा करून मोठ्यांची मने जिंकत आहे. मग एक सापही त्याच्या पायाजवळ येतो. पण लहान चिंपांझी इतका हुशार असतो की त्याला साप येत असल्याचा आवाज जाणवतो. सापाला एक नजरेने बघून छोटा चिंपांझी पटकन दूर पळतो.

आणखी वाचा : ‘या’ बोगद्यात ट्रेन लाईटशिवाय जाते, पाहा रोमांचक प्रवासाचा VIRAL VIDEO

मग तो सापाची शेपटी धरून खेळण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याचवेळी दूरवर बसलेले अनेक चिंपांझी पिल्लाचा खोडकरपणा पाहत राहतात. साप आपला जीव वाचवून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. छोटा चिंपांझीही त्याच्या मागे लागतो. मग लहान चिंपांझी सापाला पकडून मोठ्या चिंपांझीच्या दिशेने फेकतो. हे पाहून चिंपांझी बँड वाजू लागतो. दोन्ही चिंपांझी जीवासाठी धावू लागतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : याला म्हणतात खरं प्रेम! पतीला मागे बसवून आजीने मोपेड चालवली

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ग्राहकाला पार्सल देण्यासाठी ट्रेनच्या मागे धावला डन्झो एजंट…

हा व्हिडीओ संतोष सागर यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, सापांची भीती फक्त माणसांमध्येच नाही. संतोष सागर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आह. या व्हिडीओला आतापर्यंत १३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. काही लोकांनी कमेंट करून चिंपांझीचे कौतुक केले आहे. अनेक यूजर्स या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Story img Loader