Viral Video of college student dancing takes an unexpected turn: शाळेतून कॉलेजच्या आयुष्यात प्रवेश करताना विद्यार्थ्यांच्या मनात असंख्य भावना असतात. कॉलेजचा तो पहिला दिवस, यादरम्यान झालेल्या नवीन मित्र-मैत्रिणी, ती मजा-मस्ती, टपरीवरचा चहा आणि कधी मजा म्हणून लेक्चरला दांडी मारून फिरायला जाणं. कॉलेज म्हटले की, असे अनेक अनुभव प्रत्येक जण गाठीशी बांधून असतो. आता कॉलेजमध्ये एक नवीन प्रथा सुरू झालीय ती म्हणजे ‘Ice-breaking Ceremony’.
‘Ice-breaking Ceremony’ सामान्यतः शाळा किंवा महाविद्यालयातील ज्येष्ठ विद्यार्थ्यांद्वारे आयोजित केली जाते; जेणेकरून नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करता येईल आणि त्यांना जुन्या विद्यार्थ्यांशी बाँडिंग करता येईल. अशीच Ice-breaking Ceremony नुकतीच एका कॉलेजमध्ये पार पडली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला; पण त्या समारंभात नेमकं घडलं तरी काय?
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत कॉलेजमधील दोन विद्यार्थी ‘Ice-breaking Ceremony’च्या दिवशी डान्स करताना दिसतायत. गाणं सुरू होताना दोघं अगदी ताल-ठेका धरून डान्स करतात; पण अचानक रक्षाबंधनाचं गाणं वाजतं आणि ते ऐकताच दोघं अगदी आश्चर्यचकित होतात. मग काय, हे गाणं वाजताच तो मुलगा सरळ त्या मुलीचा हात सोडून बाजूला सरकतो. त्यावर ही घटना पाहणारे सगळे विद्यार्थी अगदी पोट धरून हसतात.
हा व्हिडीओ ‘?????? ????????’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताच अगदी काही वेळातच त्याला २८ दशलक्षांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. “Ice-breaking Ceremony मध्ये ज्युनियर मुलाला सीनियर मुलीबरोबर रक्षाबंधनच्या गाण्यावर डान्स करायला लावला,” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.
हेही वाचा… भररस्त्यात फेकले पैसे अन्…, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकरी संतप्त
युजर्सची प्रतिक्रिया
व्हिडीओ पाहून अनेकांचा हास्यस्फोट झालाच; पण काहींनी आपापल्या प्रतिक्रिया देत व्हिडीओवर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं की, जोपर्यंत त्यांना गाणं लक्षात आलं नाही तोपर्यंत ते मस्तपैकी नाचत होते. दुसऱ्यानं आता हा मुलगा परत कधीच डान्स करणार नाही, अशी मजेशीर कमेंट केली. एक जण म्हणाला, “दोघांचा आनंद काही सेकंदांतच नष्ट केला.”
दरम्यान, असे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. तसेच कॉलेजमधल्या याच आठवणी कायम लक्षात राहतात.