Couple Obscene Video: प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही, असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असलं की, ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं. आजकाल गार्डनमध्ये, ट्रेनमध्ये अशा सार्वजनिक ठिकाणीही कपल्स अगदी जगाची चिंता न करता आपलं प्रेम व्यक्त करू लागले आहेत.

प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही; पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. कुठेही अश्लील कृत्य करू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक कपल ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करताना दिसतायत.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्काच बसेल. या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, एक कपल ट्रेनमध्ये सगळ्यांसमोर अश्लील चाळे करताना दिसतायत. ट्रेनमधील एका सीटवर दोघंजण बसले आहेत आणि यातील तरुण तरुणीला किस करताना दिसतोय. या कपलचा व्हिडीओ ट्रेनमधील एका प्रवाशाने रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला असल्याचं दिसून येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @soul_hacker_14345 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ३.१ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “सरकारने अविवाहित जोडप्यांसाठी ओयोवर बंदी घातली आहे म्हणून ते रेल्वे सेवेचा वापर करत आहेत…” तर दुसऱ्याने “यांनी तर लाजच सोडली” अशी कमेंट केली; तर एक जण कमेंट करत म्हणाला, “हद्दच झाली, यांना आजूबाजूचंदेखील भान नसतं”

Story img Loader