Viral Video Of Cutest Puppies Following Traffic Rules : रास्ता केव्हा ओलांडावा यासाठी वाहतुकीचे काही नियम आहेत. पण, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने रस्ता ओलांडताना दिसतो. काही जण रस्त्यावरील सिग्नलच्या खांबावर हिरवा दिवा लागल्यानंतर, तर काही जण वाहनं गेल्यानंतर रस्ता ओलांडतात. सिग्नल यंत्रणा नसलेल्या रस्त्यांवर लोक वाहनांना थांबण्यासाठी हात दाखवून मग रस्ता ओलांडतात. अशातच अनेकांना रस्ता ओलांडताना खूप भीती वाटते. आज सोशल मीडियावर एक कुतूहलमिश्रित कोतुक वाटणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये श्वानाच्या दोन पिल्लांना रस्ता ओलांडताना पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) नेमका कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, रस्त्यावर अनेक वाहने ये-जा करताना दिसत आहेत आणि श्वानाची दोन पिल्ले रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ही पिल्ले एकदा डावीकडे, तर एकदा उजवीकडे पाहतात आणि मग गाड्या थांबल्या की, तुरुतुरु धावत रस्त्याच्या पलीकडे पोहोचतात. श्वानाच्या दोन्ही पिल्लांनी मिळून कशा प्रकारे रस्ता ओलांडला हे व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’

व्हिडीओ नक्की बघा…

अनेकदा रस्ता ओलांडताना आपल्याबरोबर कोणी असेल की, आपण त्याचा हात धरून किंवा कोणी रस्ता ओलांडत असेल, तर त्याच्या शेजारी उभे राहून त्यांच्याबरोबर रस्ता ओलांडतो. माणसांना असं करताना आपण अनेकदा पाहिलं असेल. पण, आज व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये (Viral Video) श्वानाच्या या दोन पिल्लांनी माणसांनाही मागे टाकलं आहे आणि एकमेकांची साथ देत ते अगदी अनोख्या पद्धतीनं रस्ता ओलांडताना दिसले आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक जण रस्ता ओलांडताना मदत करणारा असा जोडीदार, फक्त साथ देणारा असा मित्र किंवा मैत्रीण, तर काही जण प्राण्यांना वाहतुकीचे नियम पाळताना पाहून आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

एका विश्वासू माणसाला एक विश्वासू माणूस भेटला

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @puppy_cutiss या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक तर होत आहेतच; पण काही जण त्यांचे कौतुकदेखील करताना दिसले आहेत. एक युजर म्हणतोय की, एका विश्वासू माणसाला एक विश्वासू माणूस भेटला; अजून काय पाहिजे आयुष्यात. तर, इतर युजर्स श्वान दुकलीची शिस्त, सर्व गोष्टींकडे बारकाईनं लक्ष देऊन, ट्रॅफिक नियमांचं पालन करताना पाहून त्यांची प्रशंसा करीत आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांना विचार करायला भाग पाडलं आहे.