ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची जोरदार भांडण पहायला मिळत आहेत. यावेळी गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंडवर जोरजोरात ओरडताना दिसली. बरं या गर्लफ्रेंडचा राग फक्त इथवरंच जात नाही, तर तिने त्याला अनेक वेळा मारहाण देखील करण्याचा प्रयत्न केला. या दोघा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची भांडणे सोडवण्यासाठी एक डिलिव्हरी बॉय पोहोचला. पण बाई शांत व्हायचं नावच घेत नव्हती. त्यालाही ती वाईट म्हणू लागली. मग काय, डिलिव्हरी बॉयचा संयम सुटला आणि त्याने भररस्त्यात त्या गर्लफ्रेंडला मारायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिपोर्ट्सनुसार, इंदिरा गांधी पार्कमधून बाहेर पडताना या गर्लफ्रेंडचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत एका विषयावरून भांडण झालं. या भांडणात ती बॉयफ्रेंडला खूपच शिवीगाळ करू लागते आणि मारहाण सुद्धा करू लागते. चक्क बॉयफ्रेंडला तिने दगडाने मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. गर्लफ्रेंडचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचं भांडणं ही जोरदार होतं की रस्त्यावरून ये जा करणारे सुद्धा त्यांचे भांडण पाहण्यासाठी गर्दी करू लागले. तेवढ्यात एक डिलिव्हरी बॉय येतो आणि त्यांचे भांडण शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण त्या बाईचा गोंधळ वाढतच जात होता. हा डिलिव्हरी बॉय इतकं काही समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण गर्लफ्रेंड काही ऐकायचं नावच घेईना. मग या डिलिव्हरी बॉयचा संयम तुटतो आणि मग जे त्याने गर्लफ्रेंडला मारायला सुरूवात केली, ते या व्हिडीओमधली गर्लफ्रेंड तिच्या आय़ुष्यात कधीच विसरू शकणार नाही.

आणखी वाचा : Kala Angoor : ‘कच्चा बादाम’ पाठोपाठ आता ‘काला अंगूर’ गाणं होतंय VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अन् बघता बघता सारेच जण जमिनीत सामावले, अंगावर काटा आणणारा हा VIRAL VIDEO पाहाच

जेव्हा डिलिव्हरी बॉय या गर्लफ्रेंडला मारहाण करू लागतो, तेव्हा तिथे उपस्थित अनेक लोक तिला बाजुला करण्याचा प्रयत्न करू लागतात. हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मात्र, फूड डिलिव्हरी बॉय गर्लफ्रेंडला मारहाण करत असलेल्या व्हिडीओमध्ये तिचा बॉयफ्रेंड कुठेच दिसत नव्हता. आता पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.