Disabled Elder Man viral video: माणसाला आयुष्य एकदाच मिळतं ते कशा प्रकारे जगायचं हे त्याच्याच हातात असतं. जीवनात परिश्रम कोणालाच चुकले नाहीत. मेहनतीशिवाय यश प्राप्त होत नाही, असं म्हणतात. त्यात गरिबी वाट्याला आली की, मेहनत आणि कष्टाशिवाय कुठलाच पर्याय उरत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपली पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक जण दररोज जीवाचं रान करतात आणि आपली भूक भागवतात. त्यात अपंगत्व आलेलं असेल, तर आयुष्यात अनेक अडचणींना सामोरं जाण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते. अशा परिस्थितीत अनेक माणसं हतबल होतात, निराश होतात आणि आपला आत्मविश्वास गमावतात. पण, कितीही संकटं आली तरी त्यांना तोंड देऊन, संघर्ष करीत आपलं जीवन जगणाऱ्या माणसाचं कधीच वाईट होऊ शकत नाही. अशा वेळी आपलं ध्येय ओळखून जिद्दीनं उभे राहत आपलं काम करीत राहिलं पाहिजे. तीच व्यक्ती आयुष्यात पुढे जाते. सध्या अशाच एका वयोवृद्धाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक अपंग वृद्ध प्रवाशाला घेऊन सायकल रिक्षा चालविताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत एक अपंग वयोवृद्ध सायकल चालवताना दिसतोय. एका पायाने अधू असलेले हे आजोबा अगदी जिद्दीने सायकल चालवीत आहे. दुसऱ्या पायावर जोर देऊन पेडल मारून ते सायकल चालवतायत. त्यांच्यामागे एक पॅसेंजरदेखील बसला आहे. रणरणत्या उन्हात डोक्यावर कपडा बांधून, शर्ट आणि लुंगीवर हे आजोबा आपलं काम अगदी इमानदारीनं आणि मेहनतीनं करताना दिसतायत.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ @kapil.gandharv या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला, ‘आणि तुम्ही विचार करता की, तुमचं जीवन कठीण आहे’, अशी कॅप्शन दिली आहे.
हेही वाचा… “मरता मरता वाचला भाऊ”, चालत्या ट्रेनमधून उलट्या दिशेने उतरला अन्…, VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “यांनाच आयुष्याची खरी किंमत असते.” दुसऱ्याने, “त्यांच्या धाडसाला सलाम”, अशी कमेंट केली. तर अनेकांनी भावूक होऊन इमोजी शेअर करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.