Disabled Delivery Boy Viral Video: आयुष्यात कितीही आव्हानं आली तरी ते जगता आलं पाहिजे. कष्ट आणि अथक परिश्रमानेच आपण यश गाठू शकतो, असं म्हणतात. जीवनात गरिबापासून श्रीमंतापर्यंत कष्ट कोणालाच चुकलेले नाहीत; फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. परंतु, जो तो आपापल्या परीने मेहनत घेतच असतो.

गरीब व्यक्ती पोटाची भूक भागविण्यासाठी मिळेल ते काम करीत असतात. त्यात अपंगत्व आलेलं असेल, तर आयुष्यात अनेक अडचणींना सामोरं जाण्यासाठी दुप्पट जिद्द आणि मेहनत लागते. अशा परिस्थितीत अनेक माणसं हतबल होतात, निराश होतात आणि स्वत:लाच दोष देऊ लागतात. पण, अशा परिस्थितीतही जिद्दीनं उभं राहत आपलं काम जो करतो, तोच आयुष्यात पुढे जातो. सध्या अशाच एका माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक दिव्यांग डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन डिलिव्हरी करण्यासाठी सायकलवरून जात आहे.

Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Viral video of a friend putting firecracker in their mouth on social media
आयुष्याचा खेळ करू नका! सुतळी बॉम्ब पेटवला अन् मित्राच्या तोंडात टाकला, पुढे काय घडलं? पाहा VIDEO

हेही वाचा… बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या डिलीव्हरी बॉयला नक्कीच सलाम कराल. या व्हिडीओमध्ये स्विगीचा हा डिलीव्हरी बॉय पार्सल घेऊन इच्छित स्थळी जाण्यासाठी सायकलवरून आपला प्रवास करत आहे. हिमतीची गोष्ट ही की दिव्यांग असूनही जिद्द न सोडता तो आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडतोय. भरउन्हात एका हाताने चालवून त्याने आपले अथक परिश्रम सुरू ठेवले आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ @motivational_bate14 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “कमजोर वक्त है रक्त नहीं” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.५ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “डिलीव्हरी बॉयसाठी खूप आदर” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे” तर एकाने स्विगीला टॅग करत लिहिलं की, “कृपया त्याची सॅलरी वाढवून द्या”

दरम्यान, याआधीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत ज्यात दिव्यांग माणसं आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी हवे ते कष्ट करतात आणि मेहनत घेतात. गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झालेला स्विगी डिलीव्हरी बॉयचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Story img Loader