सर्व प्राणी हे मनुष्याचे सर्वात चांगले मित्र असतात असे म्हणतात. त्यामध्येही कुत्रा म्हणजे अगदी घनिष्ठ आणि निष्ठावंत असतो असे मानले जाते. घरात जर एखादे पाळीव कुत्रे असेल आणि तुमचा दिवस जर वाईट गेला असेल, तर तो गोंडस आणि निरागस जीव तुमच्या चेहऱ्यावर अगदी काही मिनिटांमध्येच हसू आणतो. आपल्या मालकाची रक्षा करणे, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणे, मदत करणे यासाठी कुत्रे अगदी तत्पर असतात. परंतु, हा नियम केवळ पाळीव कुत्र्यांना लागू पडत नाही तर रस्त्यावरील कुत्र्यांनादेखील माया लावली तर तेदेखील आपल्यावर तेवढेच प्रेम करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता पाळीव किंवा रस्त्यावरील कुत्र्यांवर एवढी चर्चा का बरं? याचे कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ. बंगळुरूमधील एका बसमध्ये एक आगळा-वेगळा प्रवासी प्रवास करत असतानाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. चार पाय, एक शेपटी असणारा हा केसाळ प्रवासी म्हणजे, रस्त्यावरील एक कुत्रे. मराठाहाली [Marathahalli] ते इंदिरानगर [Indiranagar] अशा बसमधून, अगदी नेहमी प्रवास करत असल्याप्रमाणे; सुरुवातीला एका जागेवर गोल गोल फिरून, मग आपली शेपटी हलवत, सीटवर बसलेल्या इतर प्रवाश्यांकडे बघत बसमध्ये आरामात खाली बसलेला दिसत आहे.

हेही वाचा : हत्तीची स्मशानभूमी? खरंच हा बुद्धिमान प्राणी शेवटचा श्वास घेण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जातो? जाणून घ्या…

इतरवेळेस बसमध्ये केवळ वाहकाच्या [कंडक्टर] तिकीट आणि सुटे पैसे विचारताना येणारा आवाज, बसची घंटा आणि गाडीच्या इंजिनचा आवाज सोडल्यास बाकी काहीही ऐकू येत नसते. मात्र, या गोंडस चारपायी प्रवाश्यामुळे त्या बसमध्ये हसण्याचे आणि बडबड करण्याचे आवाज ऐकू येत असून, कुत्र्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यामध्ये प्रवासी व्यस्त होते.

हा व्हिडीओ @whatsaroundbengaluru या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर झाला आहे. व्हिडीओ शेअर झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रचंड प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत, त्या पाहा.

एकाने, “बंगळुरू हे खरंच प्राण्यांवर प्रेम करणारे शहर आहे…” अशा प्रकारची कमेंट केली आहे. “बंगळुरूवर प्रेम करण्यासाठी अजून एक कारण… इथे प्राण्यांवर भरभरून प्रेम केले जाते… दररोज, प्रत्येक चौकातील कुत्र्यांना खाऊ घातले जाते”, असे दुसऱ्याने लिहिले. तिसऱ्याने, “म्हणूनच माल बंगळुरू फार आवडते” असे लिहिले आहे. परंतु, यासोबतच काहींनी चिंतासुद्धा व्यक्त करून दाखवली आहे. “बसमध्ये लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी हे थोडे काळजीचे आहे. त्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टासुद्धा नाहीये.” “जर अचानक तो कुत्रा कुणाला चावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हे अजिबात सुरक्षित नाही”, अशा स्वरूपाच्या काही प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यांनतर, १.५ मिलियन व्ह्यूज आणि ९२.३ हजार इतके लाइक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of dog enjoying bus ride in bangalore city netizens are in aww dha
Show comments