Viral video: पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा माणसांच्या जास्त जवळ असतो. कुत्रा माणसाप्रमाणेच मालकाला जीव लावतो त्यामुळे अनेक जणांचं कुत्र्यावर जास्त प्रेम असतं. कुत्र्याला माणसाचा जवळचा मित्र म्हणतात. त्याला कारणंही तशीच आहेत. अगदी सुरुवाती पासूनच, कुत्रा हे अतिशय प्रामाणिक प्राणी मानले जाते. हे मानवाच्या खूप कामी येतात. सध्या अशाच एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कुत्र्याने मोठं धाडस दाखवत आपल्या मालकाचा वाचवला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

हल्लेखोरांशी भिडला कुत्रा

खाल्ल्या मिठाला जागलास पठ्ठ्या, हो तुम्हीही असंच म्हणाल. कारण या कुत्र्यानं आपल्या मालकावर आलेलं संकट पळवून लावलं आहे. आता तुम्ही म्हणाल कुत्र्यानं असं केलं तरी काय? तर या कुत्र्यानं मालकावर हल्ला करायला आलेल्या हल्लेखोरांना सळो की पळो करुन सोडलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती आपल्या कुत्र्याला घेऊन फुटपाथवरुन चालत आहे, यावेळी अचानक बाईकवरुन तील हल्लेखोर येतात आणि व्यक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. यावेळी हे सगळं कुत्रा पाहतो आणि बहादूर कुत्रा थेट हल्लेखोराच्या अंगावर उडी घेतो आणि त्याला चावण्याचा प्रयत्न करतो.

यानंतर हल्लेखोर पुन्हा बाईकवर बसतो आणि तिघेही तिथून पळ काढतात. त्यादिवशी जर त्या व्यक्तीसोबत कुत्रा नसता तर कदाचीत त्या व्यक्तीवर हल्लेखोरांनी हल्ला केला असता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे बाप! बघा कुठे लपला होता हा खतरनाक साप; तरुणीने हात घातला अन्.., अंगावर काटा आणणारा VIDEO

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @DaleRTyMG या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

Story img Loader