अंकिता देशकर

Dolphin Stampede Video: लाइटहाऊस जर्नालिज्म ला डॉल्फिनची चेंगराचेंगरी होत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. कॅलिफोर्नियामध्ये भूकंपानंतर आलेल्या हिलरी चक्रीवादळामुळे ‘डॉल्फिन स्टॅम्पेड (चेंगराचेंगरी)’ होत असल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.हिलरी चक्रीवादळ गेल्या आठवड्यात मेक्सिकोच्या पश्चिम किनार्‍यावरून उत्तरेकडे दक्षिण कॅलिफोर्नियाकडे वळत होते. यावेळी समुद्रात प्रचंड मोठ्या लाट उसळलेल्या होत्या.

‘पाटलांचा बैलगाडा…’ गाण्यावर चिमुकल्याने केली ठसकेबाज लावणी, गौतमी पाटीललाही टाकले मागे! नवा Video Viral
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shocking video Cow attack on peoples children on road dangerous shocking video viral on social Media
भयंकर! गायीचा एकावेळी तिघांवर जीवघेणा हल्ला, टोकदार शिंग पोटात घुसवलं पायांनी तुडवलं अन्…; VIDEO पाहून थरकाप उडेल
Netflix announces Squid Game 3 release date here's when and where to watch
पुन्हा एकदा थरारक खेळ मनोरंजनासाठी सज्ज, Squid Game 3च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; कधी, कुठे पाहायला मिळणार? जाणून घ्या…
Woman dressed as mermaid dancing Inside water tried to eaten by giant fish shocking video
बापरे! महिला पाण्यात जलपरी बनून परफॉर्मन्स करत होती तितक्यात समोरून आला मासा, तोंडात पकडलं डोकं अन्…VIDEO पाहून धक्का बसेल
woman fed a thirsty monkey water
आधी बॅगेवर, मग बाकावर! पाण्याच्या थेंबासाठी सैरभैर झालेल्या माकडाला ‘तिने’ ओळखले; VIDEO पाहून म्हणाल माणुसकी आहे जिवंत
Ghost Island Caspian Sea
Ghost Island: कॅस्पियन समुद्रातील ‘भुताटकीचं बेट’ नेमकं कुठे नाहीस होतं?; नेमकं काय घडतंय?
Viral Video Of pet dog
VIDEO: ‘भिंतीवर टांगून ठेवेन…’ घरात वस्तूंची फेकाफेकी करणाऱ्या श्वानाची आईने काढली खरडपट्टी; पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही हसाल

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Darpan Solanki ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील हाच दावा शेअर करत आहेत.

तपास:

इतर वापरकर्ते देखील हाच दावा शेअर करत आहेत. गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला आढळले की हाच व्हिडिओ २३ आठवड्यांपूर्वी म्हणजेच १६ मार्च रोजी Ocean नावाच्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आला होता.

व्हिडिओचे श्रेय इतर Instagram पेजेस, @taylor.parent आणि @legacywatch यांना दिले.

आम्हाला १६ ऑक्टोबर २०२२ रोजी टेलर पॅरेंटच्या Instagram पेजवर पोस्ट केलेले रील सापडले.

legacywhalewatch ने त्यांच्या प्रोफाईलवर व्हिडिओ पिन केला होता, व्हिडिओ ६ ऑक्टोबर २०२२ रोजी पोस्ट करण्यात आला होता. कॅप्शनमध्ये म्हटले आहे: आज आम्ही लांब चोचीच्या सामान्य डॉल्फिनच्या मोठ्या पॉडची “चेंगराचेंगरी” होताना पाहिली. या भागात एक ब्रायड व्हेल देखील होती आणि गेल्या काही आठवड्यांपासून हंपबॅक व्हेल येथे दिसत आहे.

आधी मुळात डॉल्फिनची चेंगराचेंगरी होते म्हणजे नेमकं काय होतं हे आपण पाहूया..

चेंगराचेंगरी या शब्दाच्या अर्थानुसार एकाच वेळी अनेक डॉल्फिन जेव्हा एकाच ठिकाणी एकत्र येतात तेव्हा चेंगराचेंगरी होत असल्याचे म्हटले जाते. यात होतं असं की, शेकडो, अगदी हजारो डॉल्फिन अचानक एका दिशेने आश्चर्यकारक वेगाने पाण्यातून आत बाहेर झेप घेऊ लागतात, जसे की ते एखाद्या गोष्टीकडे किंवा त्यापासून दूर जात आहेत. व्हेल आणि डॉल्फिन दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये वर्षभर दिसू शकतात.

हे ही वाचा<< वंदे भारत एक्सप्रेसचा नवा लुक पाहिलात का? ट्रेन तर तीच आहे पण जरा बारीक नजरेने बघा काहीतरी वेगळं दिसेल

निष्कर्ष: डॉल्फिन चेंगराचेंगरीचा व्हायरल व्हिडिओ अलीकडील चक्रीवादळ हिलेरीचा परिणाम नव्हता. २०२२ मध्ये पोस्ट केलेला जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जात आहे

Story img Loader