Viral Video of elderly women transformation: सोशल मीडियावर रील्सचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. या रील्समध्ये मेकअप ट्युटोरियल, डान्स, विनोदी व्हिडीओ अशाप्रकारचे कॉन्टेन्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. यात ब्युटी इन्फ्लूएन्सर रोज काही ना काही नवीन मेकअप ट्रेंड्स घेऊन येतात आणि अंचबित करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘पुष्पा-२’ चित्रपटातील ‘अंगारों का’ हे गाणं गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. कलाकारांसह इन्फ्लूएंसरदेखील यावर व्हिडीओ करून डान्स करताना पाहायला मिळतायत. आता या गाण्यावर एका ब्युटी इन्फ्लूएंसरने हटके व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हाला विश्वास बसायला थोडा वेळच लागेल.

हेही वाचा… Spiderman बनून चालत्या गाडीवर स्टंट करण पडलं महागात; पोलिसांनी पडकलं अन्…, पाहा नक्की काय घडलं!

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, सुरुवातीला एक वयोवृद्ध महिला ‘पुष्पा-२’ चित्रपटातील ‘अंगारो का’ या गाण्यावर रील बनवताना दिसतेय. केस पांढरे झालेले, दात खराब असलेले, अस्ताव्यस्त कपडे अशा अवस्थेत असलेली ही वयोवृद्ध महिला या गाण्याची हुकस्टेप करताना दिसतेय. रील सुरू असतानाच अचानक त्या वृद्ध महिलेचं रुपांतर एका श्रृंगार केलेल्या तरुण स्त्रीमध्ये होतं. नाकात नथ, बिंदी, गळ्यात हार आणि सुंदर अशा साडीत ही स्त्री दिसतेय.

हेही वाचा… Lizard Found Inside Amazon Parcel: धक्कादायक! ॲमेझॉनवरून केली ऑर्डर अन् बॉक्स उघडताच सापडला जिवंत सरडा; फोटो पाहून थरकाप उडेल

हा व्हिडीओ ‘jyotibeautysalonchapra’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्योती ही एक मेकअप आर्टिस्ट आहे. असेच वेगवेगळ्या लूक्सचे मेकअप व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

युजर्सच्या प्रतिक्रिया

ज्योतीचा हा मेकअप व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, ‘पॉवर ऑफ मेकअप.’ तर दुसऱ्याने “मी तर घाबरलोच” अशी कमेंट केली. तर अनेक जणांनी दात पांढरे कसे झाले अशाप्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा… “चाचाने दिल जीत लिया”, मराठमोळ्या वयोवृद्ध रिक्षाचालकाचं इंग्रजी ऐकून व्हाल थक्क; VIDEO VIRAL होताच नेटकरी म्हणाले…

दरम्यान, या व्हिडीओवर ज्योतीचं अनेकांनी कौतुक केलंय तर काहींनी तिच्यावर टीका केलीय. ज्योतीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून याला २७.८ मिलियन व्ह्यूज आले आहेत, तर पाच लाखांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत.