हत्ती पृथ्वीवरील सर्वात सुंदर प्राण्यांपैकी एक आहे. सोशल मीडियात हल्ली प्राण्यांचे व्हिडीओ फार लोकप्रिय ठरत आहेत. प्राण्यांच्या बऱ्याचशा हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जात आहेत. त्यांची छायाचित्रे आणि व्हिडीओ इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात की काही क्षणांतच ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच तर सोशल मीडियातील प्राण्यांच्या अजबगजब व्हिडीओंची सोशल मीडियाच्या बाहेरील विश्वातही धम्माल चर्चा सुरू असते. असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे, ज्यात हत्ती एका चिल्ड्रन पार्कमध्ये खेळताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल, हे मात्र नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महाकाय हत्ती चिल्ड्रन पार्कमध्ये घुसला आणि लहान मुलांसारखा तो ही खेळू लागला. या चिल्ड्रन पार्कमध्ये असलेल्या झोक्यासोबत तो खेळताना दिसतोय. कधी दोन्ही झोक्याच्या मधोमध घुसतो तर कधी झुलत त्याच्या दिशेने येणाऱ्या झोक्याला धक्का देतो. यावेळी खेळताना हत्तीचा गोंडसपणा लोकांना खूपच आवडू लागलाय.
हा व्हिडीओ आसाममधला असल्याचं सांगण्यात येतंय. आसाममधील गुवाहाटी मिलिटरी कॅम्प इथल्या चिल्ड्रन पार्कमध्ये हा हत्ती घुसला होता. लोकांचे म्हणणे आहे की, हा हत्ती जवळच्या अमचांग वन्यजीव अभयारण्यातून भक्ष्याच्या शोधात आला असावा. आसाममधील महामार्गांवर जंगली हत्तींचे कळप दिसणे सामान्य आहे.
आणखी वाचा : सरकारी नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांनी खचाखच भरली ट्रेन आणि बस, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : हेअरड्रेसर आपल्या ग्राहकांच्या कपाळावर किस करतानाचा VIDEO VIRAL
या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर एका युजर्सने लिहिले आहे की, ‘हा हत्ती खूप गोंडस आहे’ दुसऱ्या युजर्सने लिहिले आहे की, हत्ती किती प्रेमाने खेळत आहेत. हा व्हिडीओ पाहून कुणीही या हत्तीच्या पिल्लाच्या प्रेमात पडेल .