सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये असे काही व्हिडीओ असतात जे आपल्याला आनंदीत करुन जातात. यातील काही डान्स व्हिडीओ लोकांना खूपच आवडतात. डान्स हे फक्त आता छंद किंवा फॅड राहिलेला नाही. तर कोणताही फंक्शन असो त्यात डान्स करून फंक्शन एन्जॉय करण्याचा मोह काही कुणाला आवरत नाही. त्यात काही कपल डान्सचे व्हिडीओ फारच सुंदर असतात. कपलचे डान्स व्हिडीओ पाहताना जोडप्यांमधलं प्रेम स्पष्टपणे दिसून येतं. पण सध्या कपल डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून तुम्ही चकित व्हाल. कारण या व्हिडीओमध्ये आपली पार्टनर डान्स करताना चुकली म्हणून सगळ्यांसमोर महिलेचा मारू लागला. हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास होणार नाही. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अनेक जोडपी कुठल्यातरी कार्यक्रमात पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. एका फंक्शनमध्ये बरेच जोडपी डान्स करत आहेत. मात्र यातील एक जोडपे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. एक व्यक्ती त्याच्या जोडीदाराला खूप वेगाने नाचायला भाग पाडताना दिसून येतोय. पण त्याच्या पार्टनरला वेगाने डान्स करणं जमत नाही आणि अशात ती डान्स करताना चुकीच्या स्टेप्स करू लागते. यावर तो भडकतो आणि त्याच्या पार्टनरवर आपला राग काढतो. लोकांनी खचाखच भरलेल्या या फंक्शनमध्ये तो त्याच्या पार्टनरला सर्वांसमोर कानशिलात मारायला लागतो. त्या व्यक्तीला हे करताना पाहून पुढचे जोडपे त्याला थांबवतात. पण तरीही तो ऐकण्याच्या पलिकडे गेलेला असतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप बघायला मिळत आहे.

आणखी वाचा : संतापलेल्या नवरीने ८ लाख रुपयांचे ३२ वेडिंग गाऊन कापले, पाहा हा VIRAL VIDEO

memewalanews नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असंही लिहिलं आहे: “जर तुम्ही चुकीच्या डान्स स्टेप्स केल्या तर तुम्हाला कानशिलात मारली जाईल.” या व्हिडीओचा लोक भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून लोक वेगवेगळे कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : नवरा पलंगावर आरामात झोपला होता, पत्नीने जे केलं ते पाहून त्याची झोपच उडाली, पाहा Viral Video

असा डान्स व्हिडीओ कधी पाहिला नसेल
चुकीच्या डान्स स्टेप्स केल्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या पार्टनरला कानशिलात मारत असल्याचा असा व्हिडीओ तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहिला असेल. असं असलं तरी जो व्यक्ती पार्टनरला मारताना दिसतो तो काही खास डान्स करताना दिसत नाही. पण तो स्टेप्स चांगल्या प्रकारे करतोय असं त्याला वाटतं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेहमीप्रमाणे लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

Story img Loader