Viral Video Assam Girl Dance: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात डान्सच्या व्हिडीओंचे प्रमाण जरा जास्तच आहे. लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यंत लोक आपल्या आवडत्या गाण्यावर थिरकताना दिसतात. सोशल मीडियामुळे अनेकांच्या कलागुणांना वाव मिळू लागला आहे. त्यामुळे आपली कला लोकांपर्यंत पोहोचायलाही मदत होते आणि त्यातून प्रसिद्धी व लोकप्रियताही मिळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की, त्यातील गाण्यावर अनेक जण रील्स बनवतात आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. तसंच सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा-२’ चित्रपटातील ‘अंगारो सा’ हे गाणं रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर इन्फ्ल्यूएन्सर, तसेच कलाकार थिरकताना दिसतायत. आता आसामधील एका इन्फ्ल्यूएन्सरने या गाण्यावरील एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला तब्बल १५ दशलक्षांहून व्ह्युज आले आहेत आणि याचं कारणही तितकंच खास आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ ‘aimoni_official’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या तरुणीनं अगदी हटके अंदाजात हा डान्स परफॉर्म केला आहे. डोक्यावर गुंडाळलेला कपडा, शर्ट व लुंगी अशा अगदी साध्या पोशाखामध्ये Aimoni दिसत आहे. एका बाजूला काम करीत तिनं या गाण्यावर डान्स केला आहे. या डान्समधली लक्ष वेधून घेणारी गोष्ट ठरली ती म्हणजे तिनं हा व्हिडीओ शेतजमिनीवर शूट केला आहे, जिथे ती भाताचा तरवा लावताना (भातशेती) दिसत आहे. भातशेती करीत ती या गाण्याच्या हूक-स्टेपदेखील करीत होती, हे पाहून नेटकऱ्यांनी तिच्या कलेला दाद दिली आणि अशा प्रकारे तिचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

https://www.instagram.com/p/C80pQp4BEgz/

Aimoni हिने ३० जून रोजी इन्स्टाग्रामवर डान्स व्हिडीओ शेअर केला होता. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि जवळपास एक महिन्यात तिला तब्बल १० दशलक्षांहून अधिक व्ह्युज मिळाले.

हेही वाचा… लिफ्टमध्ये अडकला माणूस पण मागे वळताच…; नेमकं घडलं तरी काय? VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

Aimoni चा हा व्हिडीओ पाहून एक युजर कमेंट करीत म्हणाला, “खूप मेहनती मुलगी आहे.” दुसऱ्यानं कमेंट करीत “देसी गर्ल”, असं लिहिलं.

दरम्यान, ‘पुष्पा-२’च्या ‘अंगारो सा’ या गाण्यावर अनेकांनी रील्स शेअर केल्या आहेत. अल्लू अर्जुन अभिनीत हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of farmer assam girl dances on angaro ka song on field with shirt and lungi dvr