सध्या सोशल मीडियावर शेतकऱ्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अनेक शेतकरी आपल्या कामाचा ताण कमी करण्यासाठी वेगवेगळे भन्नाट उपाय शोधून काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर आपल्या देशात जुगाड करणाऱ्यांची संख्या कमी नाही. शिवाय अनेक कष्टकरी कामगार अशा जुगाडाचा शोध लावतात, ज्याच्या समोर मोठमोठे इंजिनिअर्सदेखील फिके पडतात. सध्या अशाच एका शेतकऱ्याने गहू कापणीसाठी एक भन्नाट मशीन तयार केलं आहे, जे पाहून अनेकांनी या शेतकऱ्याच्या टॅलेंटचं कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या शेतीतील काम करण्यासाठी विविध प्रकारच्या यंत्रांचा उपयोग केला जातो. शेतीच्या कामासाठी वेगळ्या प्रकारची यंत्र तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची काम सोपे होते आणि वेळेचीही बचत होण्यास मदत होते. पण अनेकदा काही शेतकऱ्यांजवळ आपल्या शेतात मशीन आणण्यासाठीचे पैसे नसतात तर कधी त्यांच्या शेतापर्यंत मशीन येऊ शकत नाही. अशा वेळी शेतकरी आपल्या बुद्धीचा वापर करुन नवनवीन शोध लावून कठीण काम सोप करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या अशाच एका शेतकऱ्याने गहू कापणीसाठीची अनोख असं मशीन तयार केलं आहे. ज्याच्या मदतीने तो काही सेकंदात गहू कापण्याच काम करत आहे.

हेही पाहा- आमदाराची ड्रायव्हिंग हौस सर्वांनाच पडली महागात, कार्यकर्त्यांसह बस घातली थेट खड्ड्यात; पाहा घटनेचा थरारक Video

हेही पाहा- तरुणाने थेट नदीत बाईक घातली अन्…, धोकादायक स्टंटचा Video पाहून अंगावर येईल काटा

व्हायरल होत असलेल्या या शेतकऱ्याच्या जुगाडाचा व्हिडीओ जुना असला तरी तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक शेतकरी यामध्ये पारंपारिक पद्धतीने शेती करताना आणि एका खास मशीनचा वापर करून काही क्षणात गहू काढताना दिसत आहे. त्यामुळे तो वेळेसह पैशाचीही बचत करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

जुगाडाद्वारे केली गहू कापणी –

या शेतकऱ्याच्या जुगाडाचा व्हिडीओ @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मागील वर्षातील जून महिन्यातील आहे. मात्र, तो आताही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओला आतापर्यंत तो एक मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून शेतकऱ्याच्या टॅलेंटचे तोंडभरुन कौतुक केलं आहे.