Viral Video : वडील मुलीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, आपुलकी आणि जिव्हाळा दिसून येते. एका मुलीसाठी तिचे वडील हे सुपरमॅन असतात तर एका वडिलांसाठी त्यांची मुलगी ही एक राजकुमारी असते. मुलीला अगदी फुलाप्रमाणे वडील जपतात. तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मुलीच्या आनंदासाठी वडिलांनी तिच्याबरोबर एका आयकॉनिक गाण्यावर डान्स केला आहे. हा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला वडील आणि लेक जमीनीवर एका पोझमध्ये बसलेले दिसेल आणि ते दोघेही हाताच्या हालचाली करत आणि चेहऱ्यावर सुंदर हावभाव दाखवत डान्स करत आहे. विशेष म्हणजे दोघेही एकसारख्या स्टेप करताहेत. त्यामुळे हा व्हिडीओ आणखी सुंदर वाटतोय. “मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है” या लोकप्रिय गाण्यावर ते डान्स करताना दिसत आहे. दोघेही इतका सुंदर व अप्रतिम डान्स करतात की तुम्हाला ही रील पुन्हा पुन्हा पाहावी वाटेल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

ridima.singh and guddubhaiya.aaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”वडील आणि मुलीचा डान्स” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना तरुणीपेक्षा काकांचा डान्स खूप आवडला आहे. एका युजरने लिहिलेय, “मला माफ कर पण तुझ्या वडिलांनी मन जिंकले” तर एका युजरने लिहिलेय, “प्रत्येकाला असे वडील असायला हवे, तू खूप नशीबवान आहे” आणखी एका युजरने लिहिलेय,
“काकांवरून नजर हटत नाही, मी कित्येकदा व्हिडीओ बघतेय.” अनेक युजर्सनी काकांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

या बापलेकीची जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. या तरुणीचे नाव रिदीमा सिंग असून ती नेहमी तिच्या वडिलांबरोबरचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. त्यांच्या डान्स व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव करतात.