Viral video: रस्त्यांवर अपघात होण्यास मानवी चूक सर्वात जास्त जबाबदार आहे. बऱ्याच वेळेला वाहनचालक थोडीशी जागा मिळाल्यानंतर चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करतात. अशा वेळेला समोरून येणाऱ्या वाहनचालकाला हे माहीत नसते. तसेच वेळेची बचत म्हणून चालकांकडून काही ठिकाणी शॉर्टकट्स वापर करण्यात येतो आहे. त्यामुळे चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे, शाॅर्टकट्सचा वापर करणे असे प्रकार जीवघेणे ठरू शकतात.
वाहन चालवताना वेग हा रस्त्याची स्थिती, रहदारी व वाहनाची स्थिती लक्षात घेऊन मर्यादित ठेवावा. अती वेगाने वाहन चालवल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा वाहनचालकांची चिडचिड होते. त्यामुळे अनेकदा भांडणेदेखील होतात. असाच एका भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ट्राफिकचा प्रत्येक नागरिकाला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कधीकधी वाहचालकांमध्ये भांडणे, मारामारी होते. असाच एका हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ एका दोन कारचालकांमध्ये शाब्दिक वाद होताना दिसत आहे. हे दोघेही कन्नड भाषेत एकमेकांशी भांडत होते. त्यानंतर त्यांचा हा वाद शिगेला पोहोचतो. त्यातील एक कारचालक कारमध्ये जाऊन बसतो. तर दुसरा त्याच्या कारच्या खिडकीतून त्याला मारताना दिसत आहे. कारच्या खिडकीच्या आत हात घालून त्याने कारचालकाला बेदम मारहाण केली आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> चवताळलेल्या रेड्याने बाईक चालकाला उडवलं; शिंगानी थेट पोटात…थरारक VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा.@gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.