जगभरात रोज नवीन नवीन घडणाऱ्या घटना समोर येत असतात. त्या पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटते. आयुष्याचे निरनिराळे रंग एकत्र घेऊन मनुष्याला विविध पैलू दर्शवणाऱ्या समुद्रामध्ये कवी कल्पनांच्या पलीकडे सुद्धा अनेक रहस्य दडलेली आहेत. यापैकी काही रहस्य ही समोर आली आहेत. काही रहस्यांचा उलगडा अजुन झालेला नाही. समुद्रातीला अशाच एका रहस्यमयी माशाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. एका मच्छीमाराला तब्बल १०० वर्ष जुना मासा सापडला आहे. याचा व्हिडीओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका मच्छिमाराला तब्बल १०.५ फूट लांबीचा एक महाकाय मासा सापडला आहे. या महाकाय माशाचे वजन ५०० किंवा ६०० पौंड आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हा एक स्टर्जन मासा आहे जो १०० वर्षांचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
रिपोर्ट्सनुसार, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कॅनडाचा मच्छीमार यवेस बिसनने ब्रिटिश कोलंबियामध्ये हा महाकाय मासा पकडला आहे, ज्याचा आकार १०.५ फूट आणि वजन ५०० किंवा ६०० पौंड आहे. या विशाल स्टर्जनला पाहताच मच्छिमाराने तो मासा पकडला, त्याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला.
आणखी वाचा : याला म्हणतात माणुसकी!, VIRAL VIDEO मधली अशी मदत पाहून तुमचेही मन प्रसन्न होईल
तेव्हापासून या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मोठ्या आकाराचे आणि वजनदार स्टर्जनमुळे मच्छीमाराला खेचण्यात खूप अडचणी येत आहेत. व्हिडीओच्या शेवटी मच्छीमार मासे परत पाण्यात सोडताना दिसत आहे.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : नवरा असेल तर बायकोला होतात हे फायदे! तुम्ही कधी विचार देखील केला नसेल, पाहा VIRAL VIDEO
महाकाय स्टर्जनचा हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर व्यापलेला आहे. बातमीत दाखवलेला हा व्हिडीओ राजीव नावाच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना युजरने लिहिले की, “कॅनडामध्ये २५० किलो वजनाचा स्टर्जन पकडला गेला. ब्रिटीश कोलंबियामध्ये हा महाकाय मासा सापडलाय. हा मासा १०० वर्ष जुना आहे.” ही पोस्ट शेअर करताना RFID ला सुद्धा टॅग करण्यात आलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. इतका मोठा आणि जुना मासा तुम्ही क्वचितच पाहिला असेल.