‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ ही जुनी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. कित्येकदा लग्नात किंवा हळदीत आलेल्या मंडळींना आपल्या मित्र-मैत्रिणीच्या लग्नात नाचताना इतके बेधूंद होऊ नाचू लागतात की त्यांना कसलंच भान राहत नाही. नेमका असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये मुलांनी डीजेच्या तालावर मुलांनी इतका विचित्र डान्स केलाय की ते पाहून तुम्ही अगदी पोट धरून हसाल. हा व्हिडीओ पाहून तुम्ही कोणत्याही मूडमध्ये असलात तरी तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल, हे मात्र नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या डान्सला तुम्हा साधा सुधा डान्स समजू नका. कारण या व्हिडीओमध्ये मुलांनी असा डान्स केलाय , जो तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिला नसेल. हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला फार मजा येईल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लोक डीजेवर नाचताना दिसत आहेत. या डान्सची विचित्र गोष्ट म्हणजे लोक भक्तिगीतांवर असा अजब डान्स करत आहेत. या गाण्यावर लोक किती विचित्र डान्स करत आहेत हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. सुरूवातीला असा डान्स पाहून मनात विचार येईल की या लोक किती विचित्र डान्स करतायेत? यांच्या डान्सला काही अर्थ आह का ? असंच तुम्हाला वाटत असणार.
आणखी वाचा : चित्ता शिकारीसाठी आला असताना हरणाने अशी उडी घेतली की…, पाहा हा VIRAL VIDEO
या व्हिडीओमध्ये कोणीतरी खांबावर उभं राहून पोल डान्स करताना दिसून येत आहेत. तर कोणी जमिनीवर लोळून लोळून डान्स करताना दिसत आहे. कोणी कपडे धुत आहेत तर कोणी इतरांच्या अंगावर उड्या मारत नाचत आहेत. हा डान्स पाहण्यात जितका विचित्र आहे तितकाच लोक हा व्हिडीओ पाहून मजा घेत आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : भररस्त्यात मुलीने डिलिव्हरी बॉयला चपलीने मारलं, जे सोडवायला आले त्यांनाही तिने…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : बालकामध्ये हनुमानाचा अवतार दिसला, पाहण्यासाठी लोकांनी केली गर्दी, पाहा VIRAL VIDEO
अंशुल कौशिक नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. लोक या व्हिडीओचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो आवर्जून सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करायला विसरत नाहीत. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. लोक या व्हिडीओवर कमेंट करताना दिसून येत आहेत.