हंपबॅक व्हेल हा मासा निसर्गाची एक विलक्षण निर्मिती आहे, ज्याचा शरीराचा आकार, लांब पेक्टोरल पंख आणि नॉबी डोके आहे. हंपबॅक व्हेल ही बालीन व्हेलची एक प्रजाती आहे. ही एक रॉर्कुअल आहे आणि मेगाप्टेरा वंशातील एकमेव प्रजाती आहे. या अनोख्या आणि महाकाय हंपबॅक व्हेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मासेमारी करत असताना अचानक एका पिता-पुत्राच्या जोडीला या महाकाय व्हेल मासा दिसून आला होता. हा विशाल आकाराचा व्हेल मासा पाहून दोघेही घाबरून गेले होते.
व्हेल हा असा प्राणी आहे जो श्वास घेण्यासाठी पाण्यातून बाहेर पडतो आणि समुद्राबाहेर डोकं काढून श्वास घेतो. हंपबॅक व्हेल जगभरातील अनेक महासागर आणि समुद्रांमध्ये आढळतात. इतर प्रजातींच्या विपरीत ते दरवर्षी १६,००० किमी ९,९०० मैल) पर्यंत स्थलांतर करू शकतात. महाकाय व्हेल पाण्यातून उडी मारून बोटीला धडकल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
एनबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, बुधवारी झॅक पिलर हा मुलगा त्याच्या वडिलांसोबत मासेमारीचा आनंद घेत असताना ही घटना घडली. झॅक पिलर आणि त्याचे वडील बेलमारजवळ न्यू जर्सीच्या किनारपट्टीवर ट्यूना मासे पकडत होते, तेव्हाच अचानक छोट्या छोट्या माशांचा एक समुह वर उडताना दिसतो. पुढच्या काही सेकंदात एका मोठ्या आकाराच्या व्हेल माशाने बाहेर उडी मारलेली दिसत आहे. इतका मोठा मासा पाहून दोघेही घाबरून गेले होते आणि तो मासा त्यांच्या जहाजाच्या बाजूला धडकला. या महाकाय प्राण्याला समुद्राच्या पाण्याबाहेर आलेलं पाहून पिलरला उत्साहात किंचाळतानाही ऐकू येत आहे. हा महाकाय माशाने वर उडी घेऊन पुन्हा पाण्याखाली गेला.
आणखी वाचा : सरकारी नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांनी खचाखच भरली ट्रेन आणि बस, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
या घटनेचा व्हिडीओ मुलगा झॅक याने त्याच्या zachpiller18 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्य होऊ लागले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर तीन हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.