चित्रपट, वेबसिरीजमध्ये तुम्ही चमत्कारिक दृष्य बघितली असतील. त्यामध्ये हवेत उडणारी व्यक्ती, गाडी किंवा अचानक एका ठिकाणाहून गायब होऊन दुसऱ्या ठिकाणी प्रकट होणे, या गोष्टी दाखवल्या जातात. ही दृष्ये खरच आश्चर्यचकित करणारी आणि डोक खाजवायला भाग पाडणारी आहे. वास्तविक जीवनात हे शक्यच नाही. मात्र सोशल मीडियावर असाच अवाक करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुणी हवेत तरंगताणा दिसत आहे. तिने हे कसे केले हा चर्चेचा विषय झाला आहे.
हवेत तरंगताना दिसतेय तरुणी
द घाऊलिगन्स नावाच्या ट्विटर यूजरे हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक तरुणी हवेत तरंगताना दिसत आहे. ती स्थिर आहे. कुठलीही हालचाल करताना ती दिसून येत नाही. जमिनिपासून काही अंतरावर ही तरुणी हवेत आहे. तिचे हे कृत्य थक्क करणारे आहे. हात पसरवून हवेत असलेल्या तरुणीला पाहून हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, मात्र याचे उत्तर मिळालेले नाही.
(Viral : श्वानाने सशांसह डुक्कराच्या पिलाला दिली गाजराची पार्टी, पाहा हा क्यूट व्हिडिओ)
व्हिडिओ अमेरिकेतील असून येथील काही लोक हॅलोविनच्या तयारीला लागल्याचे सांगितले जात आहे. यावेळचा हॅलोविनचा थिम लोकप्रिय वेबसिरीज स्ट्रेंजर थिंग्सवर आधारित आहे. याच पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ बनवल्याचे समजले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दिड लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे.
हवेत तरंगणाऱ्या या तरुणीचा व्हिडिओ सर्वप्रथम डेव आणि ऑब्रे नावाच्या व्यक्तींनी टिकटॉकवर शेअर केले होता. तेथून इतर माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहे. इटरनेट हे मजेदार व्हिडिओंचे गडच झाले आहे. रोज नवनवीन व्हिडिओंमुळे मनोरंजन होत आहे.