अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा’ चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता, तरीही इतक्या महिन्यांनंतरही त्याची क्रेझ लोकांमध्ये संपण्याचं नाव घेत नाहीय. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांवर या चित्रपटाच्या गाण्यांचा फीवर चढला आहे. विशेषत: चित्रपटातील सामी-सामी गाण्याने… या गाण्याच्या डान्स स्टेप्स आणि लिप सिंगिंगचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. आता या मालिकेत एका मुलीचे नावही जोडले गेले आहे. या व्हिडीओमध्ये एका शाळकरी मुलीने यूनिफॉर्ममध्ये सामी-सामी या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ शाळा परिसरातील मैदानावरचा आहे. पुष्पा: द राईज या चित्रपटातील ‘सामी-सामी’ हे गाणं बॅकग्राऊंडमध्ये वाजत असताना ऐकू येत आहे. शाळेच्या यूनिफॉर्ममध्ये मुले त्यांच्या स्वत: च्या स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहेत, यात एक मुलगी गाण्यातील मुळ डान्स स्टेप्सना फॉलो करत अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. या मुलीचा डान्स इतका जबरदस्त आहे की हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर नक्कीच तुमचं मन भरणार नाही. या चिमुकल्या श्रीवल्लीचा अभिनय लोकांना खूप आवडला असून ते व्हिडीओचा आनंद घेत आहेत.

आणखी वाचा : माहुताच्या फोनमध्ये डोकावून पाहू लागला हत्ती, पाहा हा गोंडस VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पार्सल ट्रक पाहून बेशुद्ध होण्याचे नाटक करणाऱ्या शेळ्यांचा हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.  @tejAA___ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे. 
या व्हिडीओवर केवळ सामान्य लोकांनीच नाही तर अभिनेत्री रश्मिका मंदान्नानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘या छोट्या श्रीवल्लीच्या डान्स स्टेप्सने माझा दिवस खऱ्या अर्थाने आनंदी झाला.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘मुलीच्या अभिनयात खरोखरच परफेक्शन आहे.’ तर तिसऱ्या यूजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, ‘मुलीचा निरागसपणा पाहण्यासारखा आहे.” याशिवाय इतरही अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader