Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा शाळेतील, कॉलेजमधील, क्लासेसमधील व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात शिक्षकांचा डान्स तर मुलांची शिकवणी, कधी मजेशीर कविता तर कधी विद्यार्थ्यांची मस्ती असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, अनेकदा विद्यार्थ्यांच्या भांडणांचे, मारामारीचे व्हिडीओही व्हायरल होताना आपण पाहिले असतील. मजा-मस्करीत मित्र-मैत्रिणींमध्ये अनेकदा वाद होतात. काही वाद सहज मिटतात, पण काही वाद इतक्या टोकाला जातात की त्यांच्यात कडाक्याचं भांडण होतं.
शाळा, क्लासेस हे विद्येचे मंदिर मानले जाते. परंतु, आजकाल अभ्यास सोडून विद्यार्थी अशा ठिकाणीही आपलीच मनमानी करू लागले आहेत. भरवर्गात क्षुल्लक गोष्टींवरून भांडण करू लागले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात दोन मुलींमध्ये जोरदार भांडण सुरू आहे.
हेही वाचा… किचनतोड साफसफाई! दिवाळीआधी महिलेबरोबर घडलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत भरवर्गात भांडण सुरू असल्याचं दिसतंय. संपूर्ण विद्यार्थ्यांनी भरलेल्या एका क्लासेसमध्ये दोन मुलींचं जोरदार भांडण सुरू असल्याचं या व्हिडीओतून आपण पाहू शकतो. यात एक मुलगी बेंचवर बसून तर दुसरी मुलगी तिच्या समोर उभी राहून भांडताना दिसतेय. या दोघींच्या मध्ये एक मुलगा बसला आहे आणि या भांडणाचा त्याला त्रास होताना दिसतोय. भांडण जोरदार सुरू असतानाच हा मुलगा खूप भडकतो आणि जागेवरून उठतो. जागेवरून उठताच क्षणी तो बेंचवर जोरजोरात हात आपटतो. त्या दोघींच्या मधून बाजूला होतो, आपली बॅग फेकून देतो आणि बाहेर येऊन परत बेंचवर आपला हात आपटतो. हे भांडण सुरू असताना पूर्ण वर्गाचं लक्ष त्या तिघांच्या भांडणाकडे असतं.
हा व्हिडीओ @allovertheinternet69 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला ‘दोन मुलींमध्ये क्लेश’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल ५.५ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
हेही वाचा… बिचाऱ्याची काय चूक? स्कूटी चालवताना थेट पेट्रोल पंपावरच धडकली अन्…, VIDEO पाहून माराल कपाळावर हात
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, ‘नशीब त्या मुलाने मुलीवर हात नाही उचलला, नाही तर त्या बेशुद्ध झाल्या असत्या.’ तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, ‘याच मुलामुळे तर त्या भांडत नसतील ना.’ तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, ‘या मुलींच्या भांडणामुळे त्या मुलाला खरंच खूप राग आलेला दिसतोय’. ‘एकमेकींच्या जीवावरच उठतील’, अशी कमेंट एकाने केली.