माणूस असो वा पशुपक्षी आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी ते स्वत:च्या जीवाची पर्वा करत नाहीत. कारण त्यांचे आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असतं. त्यामुळे ज्याप्रमाणे माणूस आपल्या मुलांची काळजी घेतो, त्याप्रमाणे पशुपक्षीदेखील आपल्या मुलांची काळजी घेत असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मोराने आपल्या अंड्याचे रक्षण करण्यासाठी थेट माणसांशी पंगा घेतल्याचं दिसत आहे.
तर या व्हिडीओमध्ये अंडी चोरायला आलेल्या मुलींना मोराने जन्माची अद्दल घडवली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन मुली एका झाडावर मोराची अंडी चोरायला गेल्याचं दिसत आहे. पण त्यांच्या दुर्दैवाने तिथे एक मोर येतो आणि त्या मुलींवर हल्ला करतो. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अनेकांनी खोटा असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी तो खरा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ खरा की खोटा? ते तुम्ही स्वत: पाहिल्यानंतर ठरवा.
व्हिडीओ व्हायरल –
हेही पाहा- बिकिनीमध्ये फोटोशूट करण्यासाठी ती उभी होती, फोटोग्राफरने केलं असं काही की…Video पाहून होईल हसू अनावर
द फिगेन नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर तो ६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. दरम्यान, या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक या व्हिडिओचं कौतुक करत आहेत तर काही लोक हा फेक किंवा ठरवून शूट केलेला व्हिडिओ असल्याचे म्हणत आहेत. एका नेटकऱ्याने या मुलींना मोराने चांगली अद्दल घडवल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एका महिलेने लिहिलं आहे की, “आता तरी या मुली यातून काही चांगला धडा घेतील आणि पुन्हा पक्ष्यांची अंडी चोरणार नाहीत”