Grandma’s Reaction On Seeing Granddaughter As Bride : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो. त्यामुळे आपलं लग्न खास व्हावं यासाठी प्रत्येक जण काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात दिसतो. एखाद्या खास दिवसानिमित्त अगदी छान तयार होऊन, कुटुंबासमोर उभं राहणं हे त्या दिवसाच्या उत्सवमूर्तीनं मनातून ठरवलेलं असतं. नंतर नवरीच्या वेशभूषेत समोर आलेल्या आपल्या मुलीचं खुललेलं सुंदर रूप पाहून कुटुंबातील सदस्यही भारावून जातात आणि त्यांच्याकडे कौतुक करण्यासाठी शब्दच नसतात. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यातील नातीला नवरीच्या रूपात पाहून आजीचे हावभाव पाहण्यासारखे आहेत.

@variyata_dabas युजरचे लग्न असते. युजर सुंदर लेहेंगा परिधान करून बाहेर येते. तितक्यात नवरीच्या आजीची एंट्री होते. नवरी तिच्या आजीला विचारते, “नानी, मी कशी दिसते?” त्यावर आजी नातीला नवरीच्या रूपात पाहून तिला अलगद मिठी मारते आणि ‘ओह माय लव्ह’ असं म्हणते. पुढे व्हिडीओत आजी नातीचे लाड करते आणि पुन्हा तिला मिठी मारून रडायला लागते. नातीचं कौतुक करताना आजी भावूक होते. हे पाहून नवरी काय करते ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Shocking video Husband took VRS due to wife's illness, wife died on the day of retirement
“नियतीचा खेळ” पत्नीच्या आजारपणामुळे लवकर रिटायरमेंट घेतली, पण निरोप समारंभातच तिने साथ सोडली; VIDEO पाहून धक्का बसेल
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत

हेही वाचा…“तौबा तौबा” गाण्यावर आजीबाईंच्या ग्रुपचा डान्स ; गॉगल लावला, एकसारख्या साड्या नेसल्या अन्… पाहा VIRAL VIDEO तून ‘त्यांचा’ डान्स

व्हिडीओ नक्की बघा…

नातीला नवरीच्या रूपात पाहून आजी भावूक :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, नातीला नवरीच्या रूपात पाहून आजी तिला अलगद मिठी मारून भावूक होते. ते पाहून टिश्यू घेऊन ती मुलगी आजीचे डोळे पुसण्यास सुरुवात करते आणि आजीचा मेकअप खराब होईल, असंसुद्धा तिचं रडणं थांबविण्यासाठी म्हणते. तसेच आजूबाजूला उपस्थित असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांनासुद्धा रडू नका, असं सांगते आणि मग व्हिडीओचा शेवट होतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत चटकन पाणी येईल एवढं नक्की.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @variyata_dabas या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांना त्यांच्या आजीची आठवण आली आहे. काही जण त्यांच्या लग्नातील असे काही क्षण कमेंट्समध्ये सांगताना दिसत आहेत. तर, अनेक जण हार्ट इमोजी वापरून या हृदयस्पर्शी व्हिडीओवर व्यक्त होताना दिसले आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल आजी व नातीचं नातं जगातील सगळ्यात सुंदर नात्यांपैकी एक आहे.

Story img Loader