Video Of Elderly Couple : प्रेमाशिवाय जीवन अपूर्ण आहे, असे म्हणतात. त्यातच जोडीदार चांगला भेटला की, आयुष्य सोन्यासारखे होऊन जाते. पण, याउलट काही जणांचे काळानुसार प्रेम बदलते. लग्नापूर्वी लव्ह लाईफ कितीही चांगले असले तरीही लग्नानंतर तेच प्रेम टिकविण्याची धमक सगळ्यांमध्ये नसतेच. मात्र, हा समज एका वृद्ध जोडप्याने आपल्या उदाहरणाद्वारे खोडून काढला आहे. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आजी-आजोबांचे नि:स्वार्थी प्रेम पाहायला मिळाले आहे.

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर अनिश भगतने त्याच्या आजी-आजोबांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला अनिश ज्यांच्या लग्नाला ६० वर्षांहून अधिक काळ झाला, त्या आजी-आजोबांची गोष्ट सांगतो. काही महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांची आजी रुग्णालयात होती, तेव्हा त्याचे आजोबा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यांनी तिची काळजी घेतली आणि आता जेव्हा आजोबांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले तेव्हा आजीदेखील तितकीच निष्ठावान राहिली. एकमेकांची काळजी घेण्याऱ्या या जोडप्याचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Indian student in the US working part-time, facing deportation concerns
Donald Trump : अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी का सोडत आहेत नोकऱ्या? डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
municipal administration removed welcome sign reappeared after the protest
स्वागताचा हटवलेला फलक आंदोलनानंतर पुन्हा झळकला

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, आजोबांना रुग्णालयात दाखल केलेले असते. तेव्हा आजी पूर्ण दिवस आजोबांबरोबर होत्या. अखेर काही दिवसांनी आजोबांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आजीने पुष्पगुच्छ, अलगद मिठी मारून आणि आरती करून त्यांचे स्वागत केले. मग आजोबांच्या आवडीचे जेवण बनवले, त्याच्यासाठी मिठाई आणली आणि त्यांना स्वतःच्या हाताने जेवण भरवले आणि शेवटी आजी-आजोबांनी एकमेकांना फ्लाईंग किससुद्धा दिली आणि येथेच व्हिडीओचा गोड शेवट झाला.

काळजी, संयम आणि समजूतदारपणा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @anishbhagatt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनिश भगतने ‘खरे प्रेम फक्त हावभावांमध्ये नसते तर काळजी, संयम व समजूतदारपणाच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये असते. त्यांना एकत्र पाहिल्यावर मला अशा प्रेमावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळते, जे काळानुसार टिकते. ही रील फक्त आजोबांच्या घरी येण्याबद्दल नसून हे प्रेमाचे सेलिब्रेशन आहे, जे आम्हाला पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला शिकवते’, अशी कॅप्शन त्याने व्हिडीओला दिली आहे आणि हा व्हिडीओ पाहून सर्वच नेटकरी भारावून गेले आहेत.

Story img Loader