Grape Flavour Popcorn Video : सोशल मीडियात काय काय होईल, याचा अंदाज लावणं कठीण आहे. इथले लोक प्रसिद्ध होण्यासाठी काय करतील याच नेम नाही. अनेकवेळा हे लोक जिथं आपल्या कामातून प्रसिद्ध होतात, तिथं कधी-कधी त्यांची कृत्यं पाहून संतापही येतो. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा ज्यात एका व्यक्तीनं चक्क द्राक्षांचे पॉर्पकॉर्न तयार केलेत. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या फ्लेवरचे पॉर्पकॉर्न पाहिले असतील, त्याची चवही चाखली असेल. पण गरम तेलात द्राक्ष तळून तयार केलेले पॉर्पकॉर्न चवीला कसे असतील, याची कल्पना न केलेलीच बरी. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. तो पाहिल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित होऊन म्हणत आहेत की हे कोण आहेत, हे लोक कुठून आले आहेत!

तुम्ही आतापर्यंत क्लासिक पॉपकॉर्न, मसाला पॉपकॉर्न, पेरी-पेरी पॉपकॉर्न, कारमेल, चॉकलेटपासून अगदी फ्रूट पॉपकॉर्नपर्यंत लोकांना अनेक फ्लेवरचे पॉर्पकॉर्न आवडतात. पण द्राक्षांचे पॉर्ककॉर्न तुम्ही पहिल्यांदाच पाहिले असतील.सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पॅनमध्ये गरम तेलात द्राक्षे टाकताना दिसून येतोय. जेव्हा द्राक्षे तेलात फुटतात तेव्हा तो त्यात पॉपकॉर्नचे एक मोठे पॅकेट रिकामे करतो. या गरम तेलात पॉपकॉर्न फुटू लागतात आणि बघता बघता संपूर्ण कढई हिरव्या रंगाच्या पॉपकॉर्नने भरून जातो. विशेष म्हणजे पॉपकॉर्नचा हिरवा रंग द्राक्षांसह चवदार असल्याचे सिद्ध करतो. हा व्हिडीओ रोमांचक दिसत असला तरी तेलात तळलेले द्राक्षांचे पॉपकॉर्न या विचाराने लोकांना चक्कर येते.

आणखी वाचा : इतक्या मोठ्या पाळण्यात हा लहान मुलगा एकटाच बसला होता, VIRAL VIDEO पाहून नेटकरी पालकांवर संतापले

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या गाडीवर ‘शक्तिमान’ बनायला गेला अन् काही क्षणातच खाटेवर आला…

या पॉर्पकॉर्नचा हा व्हिडीओ डेली क्रिएटीव्ह नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून लोकांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. हा व्हिडीओ शेअर करून लोक अनोख्या पॉर्पकॉर्नची ही रेसिपी एकमेकांसोबत शेअर करताना दिसून येत आहेत. पाच दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल देखील झाला. या व्हिडीओला आतापर्यंत १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३१ हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत. बहुतेक लोकांना ही रेसिपी आवडली नाही. काही युजर्सनी पॉपकॉर्नमध्ये तेल भरल्याची तक्रार केली, तर एका युजर्सने लिहिले की, त्याने आयुष्यात पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला आहे.

Story img Loader