लग्नसोहळा प्रत्येकासाठी खास असतो. तो आणखी खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहवा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे. आपल्या जोडीदारासाठी अनेकदा नवरा-बायको खास डान्स करतात. तर अनेकदा काहीतरी सरप्राईज देतात. सोशल मीडियावर अनेकदा या लग्नसोहळ्यातील डान्सचे, सरप्राईजचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एक वरातीतला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये नवरदेवाने ऐन वरातीत जे केलं, ते पाहून तुम्हीही चकित व्हाल. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या…
नवविवाहित जोडप्याचा वरातीतला व्हिडीओ व्हायरल
नवविवाहित जोडप्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, नुकतंच लग्न झालेलं जोडपं आपल्या वरातीत धमाल करताना दिसतंय. वरात सासरी येताच नवरदेव चक्क वरातीत बेन्जो वाजवणाऱ्या कलाकारांकडून बेन्जो घेतो आणि वाजवू लागतो. बेन्जोच्या तालावर नवी नवरीदेखील अगदी उत्साहात नाचते. तेवढ्यात नवरदेवाचा मित्रही येतो आणि त्याला बेन्जो वाजवण्यात साथ देतो. सगळेच वरातीत अगदी बेधुंद होऊन नाचताना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतायत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @tushu.smarty या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “जेव्हा नवरा मुलगा स्वत:च्याच वरातीत बेन्जो वाजवून नवरीला नाचवतो” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओला तब्बल चार लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कारण, नंतर बायको तिच्या तालावर नाचवते” तर दुसऱ्याने “एक नंबर” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “जगात भारी तुमची जोडी.”