Groom Ukhana Viral: लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लग्न प्रत्येकासाठीच खूप खास असतं. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या लक्षात राहतात.
तसेच सोशल मीडियावर अनेकदा अशा लग्नसमारंभांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा संगीत सोहळा, वरात, उखाण्याचे व्हिडीओ जास्त प्रमाणात पाहिले जातात. सध्या असाच एक उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यातील नवरदेवाचा उखाणा ऐकून तुम्हीही त्याचे कौतुक कराल.
हेही वाचा… मुलांनो असा डान्स येत असेल तरच लग्न करा! वरातीत नवरदेवाने धरला ठेका, VIDEO पाहून पोट धरून हसाल
नवरदेवाचा भन्नाट उखाणा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नवरदेवाने आपल्या बायकोसाठी खास उखाणा घेतला आहे. “मित्रांनो, इथे बघा सगळ्या बायका बसल्या आहेत आणि त्या मला आग्रह करतायत की, नाव घ्या नाव घ्या म्हणून. एक नाव घेतो छान, मला सांगा की, तुम्हाला कसं वाटल ते,” असं नवरदेव व्हिडीओ रेकॉर्ड करताना म्हणाला. पुढे उखाणा घेत तो म्हणाला- “मुलगी काळी असो किंवा गोरी; राग नाही रूपाचा, रियाचं नाव घेतो संसार करीन सुखाचा.”
नवरदेवाचा हा उखाणा ऐकून, त्याला आग्रह करणाऱ्या महिलादेखील खूश झाल्या आणि त्यानं चांगला उखाणा घेतला म्हणून त्याचं कौतुकही केलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @balajigursali0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला उखाणा, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल १५.७ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
नवरदेवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “भावा, फक्त थोडे दिवस थांब; मग फुटंल तुलापण घाम.” तर दुसऱ्यानं “छान नाव घेतलंस दादा मस्त” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “छान नाव घेतलं भाऊ” “एकच नंबर आहे”, “सुखाचा संसार कर रे बाबा”, अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.