Fact Check Of Viral Video : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला एक व्हिडीओ सापडला. त्यामध्ये काही पुरुष रस्त्यावर एका मुलाला मारहाण करताना दिसले. हा व्हिडीओ गाझियाबादचा असल्याचा दावा केला जात होता. घडलं असं की, एक मुस्लीम मुलगा शाळेतून बहिणीबरोबर घरी परत येत होता. तितक्यात रस्त्यावर त्याच्यावर अमानुषपणे हल्ला करण्यात आला. तपासादरम्यान आम्हाला हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ते सविस्तर जाणून घेऊया…

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर मनोज यादवने त्याच्या अकाउंटवरून ‘गाझियाबाद : बहिणीबरोबर शाळेतून घरी परतणाऱ्या मुस्लीम मुलावर अमानुष हल्ला करण्यात आला. या घटना थांबतच नाहीत, उत्तर प्रदेशची पोलीस यंत्रणा नक्की काय करतेय?’, अशी कॅप्शन लिहून व्हिडीओ (Viral Video) शेअर केला गेला आहे.व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…

Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक
Terrifying Video of father saving his children life from accident video went viral on social media
हा VIDEO पाहून कळेल आयुष्यात वडिलांचं असणं किती गरजेचं, बापाने मरणाच्या दारातून लेकराला आणलं परत, पाहा नेमकं काय घडलं
Car is going viral on social media because of the quotes written on its back funny photo goes viral
PHOTO: पठ्ठ्याचा प्रामाणिकपणा! कारच्या मागे लिहलं असं काही की…वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल
innocent Indian mother funny video
“डिप्रेशनमध्ये जायला पैसे आहे का? आईचं उत्तर ऐकून तरुणीचं डिप्रेशन गायब झालं, पाहा माय लेकीचा मजेशीर संवाद, VIDEO होतोय व्हायरल

https://twitter.com/Manoj_Yadav_/status/1843946387161186675

इतर युजर्सदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करीत आहेत.

हेही वाचा…Viral Post : ‘तुमचा अ‍ॅटिटय़ूड खिशात…’ प्रवाशांसाठी कॅब चालकाचं पोस्टर, नियमांची यादी वाचून व्हाल थक्क

तपास :

व्हिडीओवरून मिळालेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला. या तपासाने आम्हाला कोणत्याही विश्वसनीय मीडिया रिपोर्ट्सबद्दल काही दाखवले गेले नाही. म्हणून आम्ही आमचा तपास सुरू ठेवला. यादरम्यान आम्हाला हापूर पोलिसांनी एक्स (ट्विटर)वर केलेली एक पोस्ट सापडली.

व्हिडीओमध्ये गेल्या महिन्यात घडलेल्या एका घटनेशी संबंधित उल्लेख आहे. एका मुलीने दुसऱ्या समुदायातील एका पुरुषाविरुद्ध लैंगिक अत्याचार, बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्या व्यक्तीची ओळख पटवून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाला रस्त्यावर एकत्र पाहिल्यानंतर त्याला मारहाण केली, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच ही घटना गाझियाबादची नाही. त्याचबरोबर हापूर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिशाभूल करणारा व्हिडीओ शेअर न करण्याची विनंती केली आहे.

आम्हाला स्पष्टीकरणाबद्दलचा एक अहवाल सापडला.

https://www.freepressjournal.in/india/up-hapur-police-debunk-viral-claims-of-muslim-siblings-thrashed-for-protesting-against-derogatory-comments-against-prophet

आम्हाला पोलिस आयुक्तालय गाझियाबादची एक पोस्टदेखील सापडली. त्या पोस्टमधून ही घटना गाझियाबादमधील नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आम्हाला bhaskar.com वर घटनेबद्दलचा अहवाल आणि व्हिडीओ (Viral Video) सापडला.

https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/ghaziabad/news/ghaziabad-oner-person-beating-video-viral-dasna-devi-mandir-133776356.html

निष्कर्ष : एका व्यक्तीला रस्त्यावर मारहाण केल्याचा व्हिडीओ गाझियाबादचा नसून, उत्तर प्रदेशमधील हापूरचा आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे, हे सिद्ध झाले आहे.