रुग्णालय कर्मचाऱ्याने रुग्णाला व्हिलचेअरवरुन खाली खेचत जमिनीवर ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूमधील सरकारी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राज्य मानवाधिकार आयोगाने याची दखल घेतली आहे. आयोगाने वैद्यकीय आणि ग्रामीण आरोग्य सेवा संचालकांना याप्रकरणी नोटीस पाठवली आहे.
कृष्णगिरी सरकारी रुग्णालयात ही घटना घडली आहे. रुग्णाने रुग्णालयातील कर्मचारी भास्करन याच्याकडे आपल्याला बेडपर्यंत पोहोचण्यासाठी मदत मागितली होती. यावेळी संतापलेल्या भास्करनने रुग्णाला सुनावलं आणि इतकंच नाही तर जाण्याआधी त्याला व्हिलचेअवरुन ढकलून खाली जमिनीवर पाडलं.
Watch | Tamil Nadu government hospital employee pushes patient from wheel-chair, viral video leads to action. pic.twitter.com/Y3d5yRbbBb
— The Indian Express (@IndianExpress) August 18, 2020
वृत्तपत्रातून या घटनेची माहिती मिळताच राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेत तीन आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. उत्तर देण्यास उशीर केला तर कारवाई केली जाईल असा इशाराही आयोगाकडून देण्यात आला आहे.