हिंदू धर्मातील सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळी. या वर्षी २८ तारखेपासून म्हणजे वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात झाली. दिवाळी म्हटलं की, सगळीकडे रोषणाई, कंदील, फराळ, मिठाई, नवनवीन कपडे, भेटवस्तू, फटाके अशा सगळ्या गोष्टी आपसूकच डोळ्यांसमोर येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही जण दिवे लावून, तर काही जण फटाके फोडून हा सण साजरा करतात. दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच फटाके फोडण्याचा आनंद लुटतात. अशातच अनेक जण फटाके फोडताना स्टंट करतात आणि त्यामुळे अनेकदा अपघात होऊन, लोक जखमी होतात; तर काहींच्या जीवाला धोकादेखील निर्माण होतो. परंतु, तरीही मजा-मस्ती म्हणून काही जण अशी स्टंटबाजी दरवर्षी करतच असतात आणि याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतानादेखील आपण पाहतो.

हेही वाचा… भरवर्गात त्यानं तिला…, शाळेत विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हद्दच…”

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, या दिवाळीच्या सणादरम्यान हॉस्टेलमध्ये जोरदार दिवाळी साजरी करताना दिसतायत. संपूर्ण इमारतीच्या खिडक्यांमध्ये अनेक मुलं जमा झाली आहेत आणि नेमकं काय सुरू आहे हे पाहण्यास ती उत्सुक दिसतायत. त्यातील काही मुलं इमारतीच्या खाली जमा होऊन फटाका फोडताना दिसतात. पण हा फटाका असा जबरदस्त फुटतो की, सगळे पाहतच राहतात.

काही मुलं एक फटाका लावून त्यावर ड्रम ठेवतात. फटाका फुटताच ड्रम वेगात वर उडतो. चार मजली इमारतीच्या उंचीवर उडून तो खाली आपटतो. हे पाहून सगळे टाळ्या वाजवू लागतात. हा व्हिडीओ @cis_tales या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल १०१ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… बापरे! इमारतीच्या भिंतीवर आपटून नंतर पायाने…, पाहा कशी बनवली जाते सोनपापडी, VIDEO होतोय व्हायरल

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “अणुबॉम्बपेक्षा रॉकेट सर्वांत शक्तिशाली आहे, असं मला वाटतं.” दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “हे सारे जण जे आहेत, ते इस्रोकडून नकार घेऊन आलेले दिसतायत.” तिसऱ्यानं, “हॉस्टेलमधली मुलंच असं करू शकतात.”

दरम्यान, दिवाळीत दरवर्षी फटाके फोडतानाचे नवनवीन प्रकार पाहायला मिळतात, जे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशा मजेसाठी केलेल्या स्टंटमध्ये कधी कोणी जखमी होतं, तर काहींना गंभीर दुखापत होते.