कोळी म्हटलं की, जाळे विणून त्यात किटकांना अडकवणारा आणि त्याची शिकार करणारी, निरूपद्रवी आणि त्रास न देणारा प्राणी, हो ना? एक विषारी कोळी अशी आहे की तिने चावा घेतल्यानंतर विष अंगभर पसरून मृत्यू सुद्धा होऊ शकतो. या कोळीच्या जातीचे नाव आहे ‘ब्लॅक विडो स्पायडर’. ब्लॅक विडो स्पायडरची विषारी आणि जीव घेणारी म्हणून दहशत आहे. ब्लॅक विडो स्पायडरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण, हा व्हिडीओ कमकुवत मनाच्या लोकांसाठी नाही. ही सर्वात विषारी कोळी स्वतःसाठी जाळं कशी विणते ? हे दाखवणारा हा व्हिडीओ प्रत्येकाची उत्सुकता वाढवणारा ठरलाय. एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच.

‘व्हायरल हॉग’ने हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केलाय. या क्लिपमध्ये सर्वात मोठी आणि विषारी कोळी ब्लॅक विडो स्पायडर तिने विणलेल्या जाळ्याला लटकताना दिसून येत आहे. तिचे काळे बल्बस पोट आणि लांब, टोकदार पाय स्पष्टपणे या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. काळ्या विषारी कोळीचं वैशिष्ट्य असलेल्या त्याच्या पोटावरील लाल चष्म्यासारखा आकार पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतो. हा व्हिडीओ ६ डिसेंबर २०२१ रोजी शूट करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ रेकॉर्ड करणार्‍या मायकेल मॅकक्लिंटिकने लिहिलंय की, ‘कचरा साफ करत असताना ही सर्वात मोठी आणि विषारी कोळी दिसली.”

Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

या व्हिडीओमध्ये दिसत असलेली ही विषारी कोळी सापाच्या विषापेक्षाही १५ पट अधिक विषारी असते. या विषात अल्फा-लॅटरोटॉक्सिन नावाचे रसायन असते, हे रसायन मज्जातंतूंच्या पेशींवर आक्रमण करते आणि त्यामुळे प्रचंड वेदना होतात. जेव्हा अल्फा-लॅटरोटॉक्सिन एखाद्या व्यक्तीच्या मज्जातंतू पेशीपर्यंत पोहोचते, तेव्हा आसपासच्या सर्व पेशी मृत होऊन जातात. त्यामुळे चावल्यावर तीव्र वेदना तर होतातच, शिवाय जखमेभोवती सूज येणे, स्नायूला गोळा, घाम येणे आणि थंडी वाजणे हेही होऊ शकते. परंतु कोळी सापांपेक्षा खूपच लहान असतात आणि एकाच वेळी सर्व विष सोडत नाहीत. त्यामुळे या विषाचा धोका लहान मुले आणि वृद्ध लोकांना जास्त धोका असतो.

ही क्लिप यूट्यूबवर १४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. हे पाहून अनेकजण थक्क झाले. स्पायडरची प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात इतकी छान कैद झाली की या प्राणघातक कोळीचा व्हिडीओ पाहून लोक अक्षरशः घाबरून जात आहेत. एका यूजरने कमेंट केली की, “इतकी छोटी पण तितकीच प्राणघातक गोष्ट आहे. जर मला माझ्या घरात अशी गोष्ट दिसली तर मी त्याला पायाखाली चिरडून टाकेल आणि माझं बूट जाळून टाकेन.” निसर्ग सृष्टीच्या सौंदर्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाहीत, असं देखील काही युजर्सनी कमेंटमध्ये म्हटलं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बापरे! दिवसाढवळ्या रस्ता ओलांडताना दिसला हा भलामोठा ॲनाकोंडा…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवऱ्यापासून लपवून Amazon वर केली शॉपिंग, डिलिव्हरी ड्रायव्हरने पॅकेज लपवलं सुद्धा, पण पुढे जे झालं ते पाहाच….

बरेच लोक कोळीला पाहून घाबरतात. परंतु काही लोक असेही आहेत जे कौतुकाचा विषय म्हणून पाहतात आणि त्यांचा अभ्यास करतात. शास्त्रज्ञांना नुकतंच महाराष्ट्रात कोळ्यांच्या दोन नवीन प्रजाती सापडल्या आहेत. त्यापैकी एक इसिस तुकारामी आहे, ज्याचे नाव जे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या नावावरून ठेवलं होतं.

या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये जगातील सर्वात मोठं कोळीचं जाळं आढळून आलं. ऑस्ट्रेलियातील पूरपरिस्थितीनंतर हे जाळं जणू काही रस्त्यांवर चादर ओढून घेतल्याप्रमाणे रस्त्यांच्या कडेला पसरून रस्त्यावरील खांब, झाडंझुडपं आणि उंचच उंच सर्व गोष्टींवर हे जाळं पसरून गेलं. काहींना हे एखाद्या स्वप्नासारखं वाटू लागलं तर काहींना ते भयानक वाटलं.