कोळी म्हटलं की, जाळे विणून त्यात किटकांना अडकवणारा आणि त्याची शिकार करणारी, निरूपद्रवी आणि त्रास न देणारा प्राणी, हो ना? एक विषारी कोळी अशी आहे की तिने चावा घेतल्यानंतर विष अंगभर पसरून मृत्यू सुद्धा होऊ शकतो. या कोळीच्या जातीचे नाव आहे ‘ब्लॅक विडो स्पायडर’. ब्लॅक विडो स्पायडरची विषारी आणि जीव घेणारी म्हणून दहशत आहे. ब्लॅक विडो स्पायडरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण, हा व्हिडीओ कमकुवत मनाच्या लोकांसाठी नाही. ही सर्वात विषारी कोळी स्वतःसाठी जाळं कशी विणते ? हे दाखवणारा हा व्हिडीओ प्रत्येकाची उत्सुकता वाढवणारा ठरलाय. एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘व्हायरल हॉग’ने हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केलाय. या क्लिपमध्ये सर्वात मोठी आणि विषारी कोळी ब्लॅक विडो स्पायडर तिने विणलेल्या जाळ्याला लटकताना दिसून येत आहे. तिचे काळे बल्बस पोट आणि लांब, टोकदार पाय स्पष्टपणे या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. काळ्या विषारी कोळीचं वैशिष्ट्य असलेल्या त्याच्या पोटावरील लाल चष्म्यासारखा आकार पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतो. हा व्हिडीओ ६ डिसेंबर २०२१ रोजी शूट करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ रेकॉर्ड करणार्या मायकेल मॅकक्लिंटिकने लिहिलंय की, ‘कचरा साफ करत असताना ही सर्वात मोठी आणि विषारी कोळी दिसली.”
या व्हिडीओमध्ये दिसत असलेली ही विषारी कोळी सापाच्या विषापेक्षाही १५ पट अधिक विषारी असते. या विषात अल्फा-लॅटरोटॉक्सिन नावाचे रसायन असते, हे रसायन मज्जातंतूंच्या पेशींवर आक्रमण करते आणि त्यामुळे प्रचंड वेदना होतात. जेव्हा अल्फा-लॅटरोटॉक्सिन एखाद्या व्यक्तीच्या मज्जातंतू पेशीपर्यंत पोहोचते, तेव्हा आसपासच्या सर्व पेशी मृत होऊन जातात. त्यामुळे चावल्यावर तीव्र वेदना तर होतातच, शिवाय जखमेभोवती सूज येणे, स्नायूला गोळा, घाम येणे आणि थंडी वाजणे हेही होऊ शकते. परंतु कोळी सापांपेक्षा खूपच लहान असतात आणि एकाच वेळी सर्व विष सोडत नाहीत. त्यामुळे या विषाचा धोका लहान मुले आणि वृद्ध लोकांना जास्त धोका असतो.
ही क्लिप यूट्यूबवर १४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. हे पाहून अनेकजण थक्क झाले. स्पायडरची प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात इतकी छान कैद झाली की या प्राणघातक कोळीचा व्हिडीओ पाहून लोक अक्षरशः घाबरून जात आहेत. एका यूजरने कमेंट केली की, “इतकी छोटी पण तितकीच प्राणघातक गोष्ट आहे. जर मला माझ्या घरात अशी गोष्ट दिसली तर मी त्याला पायाखाली चिरडून टाकेल आणि माझं बूट जाळून टाकेन.” निसर्ग सृष्टीच्या सौंदर्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाहीत, असं देखील काही युजर्सनी कमेंटमध्ये म्हटलं.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : बापरे! दिवसाढवळ्या रस्ता ओलांडताना दिसला हा भलामोठा ॲनाकोंडा…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
बरेच लोक कोळीला पाहून घाबरतात. परंतु काही लोक असेही आहेत जे कौतुकाचा विषय म्हणून पाहतात आणि त्यांचा अभ्यास करतात. शास्त्रज्ञांना नुकतंच महाराष्ट्रात कोळ्यांच्या दोन नवीन प्रजाती सापडल्या आहेत. त्यापैकी एक इसिस तुकारामी आहे, ज्याचे नाव जे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या नावावरून ठेवलं होतं.
या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये जगातील सर्वात मोठं कोळीचं जाळं आढळून आलं. ऑस्ट्रेलियातील पूरपरिस्थितीनंतर हे जाळं जणू काही रस्त्यांवर चादर ओढून घेतल्याप्रमाणे रस्त्यांच्या कडेला पसरून रस्त्यावरील खांब, झाडंझुडपं आणि उंचच उंच सर्व गोष्टींवर हे जाळं पसरून गेलं. काहींना हे एखाद्या स्वप्नासारखं वाटू लागलं तर काहींना ते भयानक वाटलं.