सोशल मिडियावर रोज प्राण्याचे वेगवगेळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कुत्रा-मांजरांचे, कधी माकडांचे, कधी प्राण्यांच्या शिकारीचे, कधी बिबट्याचे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक अस्वल दिसत आहे. पण हा व्हिडीओ पाहून हे अस्वल नसून अस्वलाच्या वेशातील माणूस आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. कारण व्हिडीओमधील अस्वल हे माणसासारखे मागच्या दोन पायांवर उभे असल्याचे दिसत आहे. मात्र, प्राणीसंग्रहालयाने निवेदन जारी करून या अफवा फेटाळून लावल्या आहेत. ”आमचे अस्वल खरे आहे, अस्वलाच्या वेशात कोणी माणूस नाही”, असा दावा प्राणीसंग्रहायलाने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ पूर्व चीनमधील आहे. सोशल मीडियावर या अस्वलचा व्हिडीओ व्हायरला झाल्यानंतर प्राणीसंग्रहालयाला हे विधान जाहीर करावे लागले. वास्तविक, हा सन बिअर (Sun Bear) आहे. प्राणीसंग्रहालयाने दिलेल्या माहितीनुसार, ”सन बिअर, जगातील सर्वात लहान अस्वल प्रजाती, सहसा मोठ्या कुत्र्याचा आकार असतो.”

हेही वाचा – तुळशीबाग, भाजी मंडईमध्ये दिसले पंतप्रधान मोदी? जाणून घ्या व्हायरल फोटोंचे सत्य

माणसासारखे उभे असलेले अस्वल तुम्ही कधी पाहिले आहे का?

हा व्हिडिओ १ ऑगस्ट रोजी @Pop Base या ट्विटर हँडलने पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – ”चीनमध्ये असलेल्या हांगझू प्राणीसंग्रहालयाने, प्राणीसंग्रहालयातील सन बिअर सूट घातलेला माणूस असल्याच्या सोशल मीडिया अफवांचे खंडन केले. काही लोकांना असे वाटते की [अस्वल] एखाद्या व्यक्तीसारखे उभे आहे… असे दिसते की तुम्हाला [अस्वल] नीट समजत नाही.”

व्हिडिओमध्ये अस्वल आपल्या मागच्या पायावर उभे राहून पर्यटकांकडे पाहत असल्याचे दिसत आहे. हांगझू प्राणीसंग्रहालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ”अस्वल हे मलायन सूर्य अस्वल आहे, अस्वलाची सर्वात लहान प्रजाती आहे. ते तपकिरी काळ्या अस्वलाच्या अर्ध्या आकाराचे आणि बारीक असतात.”

हेही वाचा – दोरीवर उड्या मारणाऱ्या मुलांना पाहून थक्क झाले आनंद महिंद्रा, शेअर केला World Jump Rope Championshipचा व्हिडीओ

मलायन अस्वल बारीक असते

‘Hangzhou Zoo’ चे दिग्दर्शक म्हणाले – जेव्हा अस्वल असे म्हणतो तेव्हा मनात पटकन एक चित्र येते ते एक शक्तिशाली आणि मोठा प्राणी असेल… पण सर्व अस्वल असे नसतात. मलायन अस्वल बारीकआणि दुबळे आहे, जे जगातील सर्वात लहान अस्वल मानले जाते. प्राणीसंग्रहालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की,”हा प्राणी खरा आहे आणि अशी फसवणूक सरकारी सुविधांमध्ये होणार नाही.40 अंश सेल्सिअस तापमानात अस्वलाचा सूट घालून कोणीही माणूस जास्त काळ जगू शकणार नाही.” असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of human like bear at chinese zoo sets internet on fire malayan bear black sun bear snk
Show comments