Husband Wife Viral Video: नवरा बायकोचं नातं जगावेगळं असतं. या नात्यात जितकं प्रेम असतं तितकीच काळजी, तितकंच सुखदेखील असतं. आपल्या जोडीदाराच्या मनातलं न सांगता कळणं म्हणजेच प्रेम. या नात्यात सगळंच कसं सहज सोप वाटू लागतं. पण आयुष्यात आपल्या मनासारखा योग्य जोडीदार मिळणं म्हणजे नशीबच समजायचं. आपल्या आवडीच्या माणसाचा क्षणभर सहवास जरी लाभला तरी तो हवाहवासा वाटतो. या नात्यात फक्त प्रेम आणि प्रेमाची अपेक्षा असते आणि दोन्ही बाजूने प्रेम जर समान असेल तर आयुष्याचा प्रवास सुखकर होतो.
पण जर फक्त नात निभवायचं म्हणून त्या बंधनात कोणीही अडकलं तर आयुष्य खूप खडतर होऊ लागतं. मग या नात्यात कोणीही सुखी राहत नाही. अनेकदा आई वडिलांच्या दबावाखाली मुली जबरदस्तीने लग्न करतात आणि मग त्या संसारात रमत नाही. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नवऱ्याने बायकोचं लग्न लावून दिलं अन्…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक नवरा आपल्या बायकोचं तिच्या प्रियकराबरोबर लग्न लावून देतो. व्हिडीओत आफण पाहू शकतो की, दोघांचं लग्न पार पडतंय. यात त्याची पत्नी खूप रडताना दिसतेय. नवऱ्याने इतकं मोठं पाऊल उचललंय की तिला अश्रू अनावर झालेत असं दिसून येतंय.
इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “एका पतीने आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकरासोबत लावले, त्यांचे १२ वर्षे प्रेमसंबंध होते आणि त्यांना २ मुलेही होती, पण पत्नीला तिच्या पतीसोबत राहण्यास रस नव्हता, संतकबीर नगर, उत्तर प्रदेश” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, जर इतकीच समस्या होती, तर एकत्र राहयचंच का? तर दुसऱ्याने “हम दिल दे चुके सनम या सिनेमातला अजय देवगन असणार हा नक्की” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “पोटगी आणि जीवन वाचवण्यासाठी त्याने योग्य पर्याय निवडला.”