Video of Influencer Throwing Money On the Road: सोशल मीडियावर नेहमी असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडियाची क्रेझ जशी दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्याचप्रमाणे स्वत:ला इन्फ्लूएन्सर म्हणवणारे काही लोक हद्द पार करू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. काही व्ह्युज आणि लाइक्ससाठी ते स्वत:सह इतरांचा जीवही धोक्यात टाकायला मागे-पुढे पाहत नाहीच. अशाच एका इन्फ्लूएन्सरने प्रसिद्धी मिळविण्यासाठी भररस्त्यात जीवघेणे कृत्य केले आहे. त्यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

हेही वाचा… “जय महाराष्ट्र”, परदेशी महिलेला मराठीची ओढ, सोशल मीडियावर शेअर केला ‘हा’ VIDEO; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हैदराबादच्या कुकटपल्ली भागात एक विचित्र घटना घडली, जेथे एक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर भररस्त्यात काही पैसे उडवताना दिसला. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो माणूस रस्त्याने चालता चालता हातातील पैशांचे बंडल हवेत फेकताना दिसत आहे. दोन्ही हातांत नोटा घेऊन, त्याने रस्त्यावरील वाहनांची वाहतूक विस्कळित करून भररस्त्यात पैशांचा वर्षाव केला आहे. यादरम्यान, रस्त्यावरील अनेक लोक ते पैसे जमा करण्यासाठी रस्त्यात गर्दी करताना दिसतायत.

अशा प्रकारच्या स्टंटमुळे रहदारीच्या रस्त्यावर अपघातही घडू शकतो आणि त्यामुळे कोणाचाही जीव धोक्यात येऊ शकतो. या घटनेचा व्हिडीओ त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या काही लोकांनी रेकॉर्ड केला. तसेच, त्या इन्फ्लूएन्सरनेदेखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा… महिला रेस्टॉरंटमध्येही असुरक्षितच! वेट्रेसच्या चेहऱ्यावर ग्राहकाने फोडली प्लेट अन्…, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

‘Mahesh Goud #9999#’ या x अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या युजरने तेलंगणा पोलिसांना टॅग करून “कन्टेटच्या नावाखाली रस्त्यावर उपद्रव निर्माण करणाऱ्या अशा लोकांना तुम्ही चेतावणी देऊ शकता का?” असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे.

युजर्सचा संताप

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “पोलिसांनी याच्यावर कडक कारवाई करावी.” तर दुसऱ्याने, “त्याच्यावर गुन्हा दाखल करून, त्याला तुरुंगवास द्यावा आणि दंड आकारावा”, अशी कमेंट केली.

हेही वाचा… स्टंट करणं पडलं महागात! २४ जणांना अटक केली अन्…, VIDEOतून पाहा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

दरम्यान, याआधीही अनेकदा अशा प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत; परंतु अशा घटनांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नेटकरी संतप्त झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of influencer throwing money on the road in hyderabad risks peoples lives for reels on social media dvr