इंडिया तिबेट बॉर्डर पोलिस अर्थात आयटीबीपी जवानांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. आपल्या देशाच्या लष्करावर प्रत्येक भारताच्या मनात अफाट आदर आणि प्रेम आहे. अनेकदा सोशल मीडियावर सैनिकांचे व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या मनात देशप्रेम भरभरून येते. सैनिकांशी संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात देशभक्ती दिसून येते. कडक ऊन असो वा कडाक्याची थंडी..प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय लष्कराचे जवान सीमेवर उभे असतात. आयटीबीपी जवान म्हणजेच हिमवीरांचा आणखी एक नवा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.
तुमच्या लहानपणी तुम्ही एकदा तरी ‘मामाचं पत्र हरवलं…ते मला सापडलं’ हा खेळ खेळला असेलच. पण सध्या स्मार्टफोन्सच्या जमान्यात हा खेळ खरोखरंच हरवून गेला आहे. पण भारतीय सीमेवर तैनात असणाऱ्या हिमवीरांना मात्र या खेळाचा विसर नाही पडला. सैनिक शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे खेळ खेळताना दिसतात. आता नुकताच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ITBP जवान बर्फाळ प्रदेशात एका टेकडीवर चक्क ‘मामाचं पत्र हरवलं…ते मला सापडलं’ हा भन्नाट खेळ खेळताना दिसून आले आहेत. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : परवानगीशिवाय काढत होती फोटो, मग हत्तीने तरूणीला चांगलाच धडा शिकवला
ITBP जवानांची पोस्टिंग अशा ठिकाणी असते जिथे राहणं हे काही सोप्पं काम नाही. पण या सैनिकांची ही धैर्य आणि ट्रेनिंगची कमाल आहे की इतक्या कठीण परिस्थितीतही ते स्वतःसाठी मौजमजेचे काही क्षण घालवत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही ITBP चे हिमवीर हजारो फूट उंचीवर आणि गुडघ्यापर्यंत गोठलेल्या बर्फातही खूप आनंदी आणि खेळताना, बागडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ हिमाचल प्रदेशातील असून हिमवीर इथे नुकत्याच पडलेल्या बर्फामध्ये मामाचं पत्र हरवलं, ते मला सापडलं हा खेळ खेळत आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : पेट्रोल पंपावर गाडी थांबवण्याची चूक पडली महागात, डोळ्यादेखत चोरट्यांनी गाडी पळवून नेली
हा व्हिडीओ ITBP च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत एक कॅप्शन देखील लिहिण्यात आलीय. “ताजा हिमवर्षाव आणि मित्रांसोबत बालपणीचा हा खेळ… हिमाचल प्रदेशात ताज्या हिमवर्षावानंतर इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) कर्मचारी ‘मामाचं पत्र हरवलं हा खेळ खेळत आहेत.”
आणखी वाचा : वऱ्हाडींना मागे टाकत नवरदेव वरातीत एकटाच नाचू लागला, या गाण्यावरचा क्लासिकल डान्स VIDEO VIRAL
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : वानर आणि लहान मुलामध्ये रंगली जबरदस्त फाईट, लढाईचा कसा झाला शेवट? पाहा हा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ शेअर करताच तो व्हायरल सुद्धा झाला. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५००० हून जास्त व्ह्यूज मिळाले आहे. यावर अनेक यूजर्सच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, आम्ही लहानपणी हा गेम खूप खेळलो आहे. पुन्हा आठवणी ताज्या झाल्या. आणखी एका यूजरने लिहिले की, “आम्ही हा गेम खूप खेळला आहे.”