शाळा हे विद्येचे मंदिर असते जिथे शिक्षिक विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार देतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अत्यंत महत्त्व दिले जाते. ईश्वराचे स्थान गुरुला दिले जाते कारण विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानमयी प्रकाश निर्माण करतात. आई वडिलांनंतर गुरुला महत्त्वाचे स्थान दिले जाते. एक चांगला शिक्षिक शिष्याचे आयुष्य घडवू शकतो पण ज्या शिक्षकांना विद्यार्थ्यांचा आदर्श मानला जातो, जे विद्यार्थ्यांवर संस्कार करतात, विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतात तेच शिक्षका जेव्हा विद्यार्थ्यांकडून सेवा करून घेत असतील तर विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होईल? सध्या अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ Viral झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये जयपूरच्या एका सरकारी शाळेतील आहे. व्हिडीओमध्ये एक शिक्षिका जमिनीवर झोपलेली दिसत आहे आणि दोन विद्यार्थी त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर सरकारी शाळेच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. तसेच शैक्षणिक व्यवस्थेतील योग्य वर्तनाबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. का हे शिक्षिका विद्यार्थ्यांकडून स्वत:ची सेवा करून घेत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन शाळकरी मुले शिक्षिकेचे पाय दाबताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि एकापेक्षा जास्त X खात्यांद्वारे हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर होत आहे. एका वापरकर्त्याने प्रश्न केला, “यामध्ये काय गैर आहे?” तर दुसऱ्याने लिहिले, “योग्य नाही.”
याप्रकरणी शिक्षिकाला निलंबित करण्यात आले असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.
https://x.com/prashantrai280/status/1844228684385001654/
शाळेच्या मुख्याध्यापिका अंजू चौधरी यांनी व्हिडिओ पाहिल्याचे कबूल केले परंतु त्यांना विशिष्ट घटनेबद्दल माहिती नव्हती. त्यांनी नमूद केले की, शिक्षिकेची तब्येत बिघडली असावी आणि त्यांना मुलांना तिच्या पाय दाबण्यास करण्याची विनंती केली असावी. मात्र, या प्रकरणाची चौकशी करून सत्यता समोर येईल.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, करतारपुरा येथील सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षिकेला विद्यार्थी शिक्षिकाचे पाय दाबत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षकाला निलंबित करण्यात आले. शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी या वर्तणूकीवर टीका करत शाळांमध्ये असे वर्तन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले.